LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

*अखेर वाद मिटला..**आमदार अभिजीत पाटील यांनी पालकमंत्री व प्रशासनासह अंजनगाव खेलोबा येथील ग्रामस्थांचे मानले आभार*


सध्या चर्चेत असलेला अंजनगाव खेलोबा येथे छत्रपती शिवरायांच्या स्मारक उभारण्याबाबत उद्भवलेला वाद अखेर समन्वयक साधून मार्गी लागला आहे. सोलापूर पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी साहेब यांनी अत्यंत संयम आणि समन्वयाची भूमिका घेत, दिलेल्या तोडग्यावर दोन्ही बाजूंच्या नागरिकांनी एकमत दर्शवले. त्यांच्या या सकारात्मक हस्तक्षेपाबद्दल त्यांचे विशेष आभार मानतो...

याप्रक्रियेत सोलापूरचे पालकमंत्री ना.जयकुमार गोरे साहेब, पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी साहेब तसेच नवीन जिल्हाधिकारी कार्तिकेयन साहेब यांनीही समन्वय आणि एकोप्याची भूमिका बजावत परिस्थिती सुरळीत करण्यासाठी मोलाचे योगदान दिले. त्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार..  तसेच समाजातील दोन्ही बाजूंच्या नागरिकांनी दाखवलेला संयम आणि सहकार्य याबद्दलही आपण कृतज्ञ आहोत..

याप्रक्रियेत पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी साहेब, IPS अधिकारी अंजली कृष्णा मॅडम, IPS प्रशांत डगळे साहेब, पोलीस उपाधीक्षक देवळेकर साहेब, प्रांताधिकारी जयश्री अव्हाड मॅडम, तहसीलदार संजय भोसले, माढ्याचे पोलीस निरीक्षक राहुल शिंदे साहेब, कुर्डूवाडीचे पोलीस निरीक्षक अतुल मोहिते साहेब तसेच इतर प्रशासनातील अधिकाऱ्यांनी समन्वयाची भूमिका घेत शांतता राखण्याचे प्रयत्न केले.

मी देखील गेली तीन दिवस थांबून दोन्ही समाजात तेड निर्माण होणार नाही, दोन्ही समाजाची मत मतांतर जाणून घेत सामंजस्यपणे मार्ग काढण्याचे व समाजात एकोप्याच वातावरण ठेवण्यासाठी प्रयत्नशील होतो. माझ्यावर देखील टीका टिपण्या झाल्या परंतु समाजामध्ये वाद विवाद न होता, दोन्ही समाज एकत्र आणून सलोख्याचे वातावरण करण्याचा माझा प्रामाणिकपणे हेतू होता आणि तो कायम राहील असा उपदेश आमदार अभिजीत पाटील यांनी केले.

ग्रामस्थांनीही दोन्ही बाजूंनी सकारात्मक भूमिका घेत वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. तथापि, काही बाहेरील घटकांच्या हस्तक्षेपामुळे या प्रक्रियेला विलंब झाला. तरीही सुमारे चाळीस ग्रामस्थ एकत्र बसून चर्चेद्वारे तोडगा काढण्यात यशस्वी झाले. यामध्ये फरांडे महाराजांसह सर्व संबंधितांनी एकमत साधत हा चिघळलेला विषय शांततेत सोडवला.

याप्रसंगी पालकमंत्री महोदयांनी छत्रपतींच्या स्मारकासाठी १कोटी रुपयांचा निधी जाहीर केला, त्याबद्दल आपण त्यांचे विशेष आभार मानतो. तसेच आमदार निधीतूनही १०लाख रुपये देण्याचा शब्द दिला असून, बसस्थानकाच्या जागेत बदल झाल्यास त्या ठिकाणी नवीन बसस्थानक उभारण्यासाठीही सकारात्मक भूमिका घेण्यात आली आहे.

छत्रपती शिवरायांचे स्मारक हे आपल्या सर्वांसाठी प्रेरणास्थान असून, पुढील काळातही ते सर्वांना प्रेरणा देत राहील, याची आपण खात्री देतो. तसेच खेलोबा देवस्थानचा देखील आशीर्वाद कायम सोबत असून, मंदीरांचे परमपूज्य पूजारी, मानकरी आणि ग्रामस्थांचे योगदान मोलाचे होते.

आजी माजी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य तसेच गावातील युवा तरुणांनी संयम आणि समन्वयाने निर्माण झालेला संघर्ष मिटवण्यासाठी पुढाकार घेतला, याबद्दल सर्वांचे आमदार अभिजीत पाटील यांनी आभार मानले..

Post a Comment

0 Comments