LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

स्वेरीच्या सिव्हिल इंजिनिअरिंगचा अभ्यास दौरा यशस्वी संपन्न

पंढरपूर– गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील श्री. विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (ऑटोनॉमस) च्या सिव्हिल इंजिनिअरिंग विभागात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी दि. २६ मार्च ते दि. २८ मार्च २०२५ या कालावधी दरम्यान औद्योगिक अभ्यास दौऱ्याचे आयोजन केले होते. करिअरच्या दृष्टीने विद्यार्थ्यांसाठी हा तीन दिवसीय अभ्यास दौरा अत्यंत महत्वाचा ठरला. या अभ्यास दौऱ्याचा विद्यार्थ्यांना भविष्यात नक्कीच फायदा होणार आहे. 
       ‘इंडस्ट्रीयल व्हिजीट’ हा शिक्षणाचा एक भाग असून या इंडस्ट्रीयल व्हिजीट तथा अभ्यास दौऱ्यात सिव्हिल इंजिनिअरिंगच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या वर्षातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या विद्यार्थ्यांनी बांधकामाच्या दृष्टीने सिव्हिल इंजिनिअरिंगचा उत्तम नमुना असलेले कालाराम मंदिर, रामशेज किल्ला, त्र्यंबकेश्वर मंदिर, महाराष्ट्र इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट (एमईआरआय), नाशिक, शिर्डी साईबाबा मंदिर, देवगिरी किल्ला, वेरूळ येथील लेणी, घृष्णेश्वर मंदिर, संभाजीनगर, अशा ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि अभियांत्रिकीच्या अभ्यासाच्या दृष्ट्या महत्त्वाच्या स्थळांना, वास्तूंना भेटी देवून बांधकामाचे निरीक्षण केले तसेच महाराष्ट्र इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट (एमईआरआय), नाशिक येथे विद्यार्थ्यांनी पाणी व्यवस्थापन, धरणांच्या देखभालीसाठी आवश्यक असलेल्या तंत्रज्ञानाची माहिती, जलसंपत्ती व्यवस्थापन आणि भूगर्भशास्त्राशी संबंधित संशोधन पद्धती जाणून घेतल्या. या अभ्यास दौऱ्याद्वारे विद्यार्थ्यांना प्राचीन स्थापत्यशास्त्र, धार्मिक स्थळांचे वास्तुशिल्प, तसेच अभियांत्रिकी संशोधन केंद्राची सविस्तर माहिती मिळाली. जवाहरलाल नेहरू पोर्ट ऑथॉरिटी (जेएनपीए), मुंबई, शिवसमर्थ स्मारक, मुंबई, एलेफंटा लेणी, कार्ला लेणी, पवना धरण, राजीव गांधी प्राणी संग्रहालय, पुणे, आणि सेंट्रल वॉटर अँड पॉवर रिसर्च स्टेशन (सीडब्ल्युपीआरएस), खडकवासला, पुणे या ठिकाणी भेटी दिल्या. जवाहरलाल नेहरू पोर्ट ऑथॉरिटी (जेएनपीए), मुंबई येथे विद्यार्थ्यांनी भारतातील सर्वात मोठ्या आणि व्यस्त बंदरातील सागरी वाहतूक व्यवस्थापन, मालवाहतूक नियंत्रण आणि पोर्ट ऑपरेशन्सची सखोल माहिती घेतली. शिवसमर्थ स्मारक, मुंबई येथे विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनकार्याची माहिती तसेच स्थापत्यकलेचा अद्वितीय अनुभव आला. सेंट्रल वॉटर अँड पॉवर रिसर्च स्टेशन (सीडब्ल्युपीआरएस), खडकवासला, पुणे येथे विद्यार्थ्यांना जलसंपत्ती व्यवस्थापन, धरण मॉडेल्सचे विश्लेषण आणि जलशास्त्रविषयक संशोधन कार्याची माहिती मिळाली. विद्यार्थ्यांना जलस्रोत व्यवस्थापन, पूर नियंत्रण आणि जलविद्युत प्रकल्पांच्या कार्यपद्धतीची सखोल माहिती प्राप्त झाली. या दौऱ्याद्वारे विद्यार्थ्यांना आधुनिक पायाभूत सुविधा, जलव्यवस्थापन, प्राचीन स्थापत्यशास्त्र आणि पर्यावरण संवर्धनाची माहिती मिळाली. सदरची माहिती पवना डॅमचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता पी.ए.जाधव, शास्त्रज्ञ (वर्ग-ब) डॉ.ए.के.सिंग, जेएनपीए चे जनसंपर्क अधिकारी संजय पाटील व एमईआरआयचे उपविभागीय अधिकारी डी.एन.पहाडे यांच्यासह तेथील अधिकाऱ्यांनी माहिती दिली. या औद्योगिक अभ्यास दौऱ्यामुळे अभियांत्रिकी मधील विद्यार्थ्यांना शैक्षणिक ज्ञानाबरोबरच प्रत्यक्ष काम करत असलेल्या ठिकाणी तेथील अधिकारी व कर्मचाऱ्यांना काय काय करावे लागते याचा प्रत्यय आला. यामुळे सिव्हिल अभियांत्रिकी क्षेत्रातील व्यावहारिक ज्ञान समृद्ध झाले. विविध क्षेत्रातील अभ्यासक्रमाशी संबंधित तांत्रिक माहिती प्रत्यक्ष स्थळांना भेट देऊन विद्यार्थ्यांना मिळाल्याने त्यांच्या व्यावसायिक दृष्टीकोनात सकारात्मक बदल घडला. त्यामुळे विद्यार्थी उत्साही दिसून आले. सदरचा औद्योगिक अभ्यास दौरा (इंडस्ट्रीयल व्हिजीट) हा स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे यांच्या दिशादर्शन मार्गदर्शनाखाली, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूरच्या विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. पी.एम. पवार, कॅम्पस इन्चार्ज डॉ. एम. एम. पवार व उपप्राचार्या डॉ. मिनाक्षी पवार, यांच्या सहकार्याने व विभागप्रमुख डॉ. एस. पी. पाटील यांच्या नेतृत्वखाली आयोजित केला होता. या अभ्यास दौऱ्यामध्ये १६७ विद्यार्थ्यांसह प्रा. ए. एल. लुगडे, प्रा. एस. एस. पाटील, प्रा. एस. डी. पाटील, प्रा. एम. व्ही. डोंगरे, प्रा. पी. बी. भागानगरे, प्रा. जी. एस. घाडगे, प्रा. सी. आर. लिमकर, प्रा. ए. बी. कोकरे, प्रा. पी. एच. गुंड, प्रा. पी. व्ही. केळकर, प्रा. एन. व्ही. महामुनी, प्रा. टी. एस. थिटे आणि प्रा. ए. एस. चौगुले यांनी सहभाग घेतला.

Post a Comment

0 Comments