पंढरपूर प्रतिनिधी
सध्या पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात जीर्णोद्धाराचे काम सुरू असताना बाजीराव पडसाळी या भागात खोदकाम सुरू होते दरम्यान या ठिकाणी दगडी रांजण सापडले असल्याचे दिसून येत आहे तर हे रांजण मधून कापले असल्याचे दिसत आहे या रांजणात काय सापडले काय होते का मोकळे होते असा प्रश्न तमाम पंढरपूरकरांना पडला आहे तरी यात खोदकामात जुन्या मौल्यवान वस्तू सापडल्या की काय असाही प्रश्न दबक्या आवाजात मंदिर परिसरात बोलला जात आहे याबाबत श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने तात्काळ खुलासा करावा अशी ही मागणी जोर धरू लागली आहे
तसेच महर्षी वाल्मिकी संघटनेचे अध्यक्ष गणेश अंकुशराव यांनी याबाबत मंदिर समितीने लवकरात लवकर खुलासा करावा अशी मागणी केली असून जर मंदिर समितीने हा खुलासा केला नाही तर मंदिर समितीच्या विरोधात आंदोलन करावे लागेल असाही इशारा त्यांनी यावेळी दिला आहे
0 Comments