नवी दिल्ली 12 ऑगस्ट : आत्तापर्यंत तुम्ही नद्यांमध्ये किंवा प्राणीसंग्रहालयात अनेकदा मगरी पाहिली असतील. त्यांच्या जवळ जायलाही लोक थरथर कापतात. पण कल्पना करा की तुम्ही घरी बसला आहात आणि अचानक जमिनीतून मगर बाहेर आली तर काय होईल?
ट्विटरवर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये असंच दृश्य दिसत आहे. यात जमिनीच्या आतून एकामागून एक तीन मगरी बाहेर येताना दिसतात. हा व्हिडिओ भारतातीलच कोणत्यातरी राज्यातला आहे.ट्विटरवर अनेक अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. न्यूयॉर्क पोस्टच्या रिपोर्टनुसार, शेजाऱ्यांना घराच्या खालून काही आवाज आला.
खाली कोणीतरी प्राणी भिडले असल्यासारखं वाटलं. विशेष म्हणजे वरून जमिनीवर प्लास्टर होतं. मात्र एका ठिकाणी जमिनीचा भाग काहीसा तुटलेला होता. तरुणांनी जवळ जाऊन पाहिलं असता त्यांचा विश्वासच बसेना.
ते भीतीने थरथर कापू लागले. त्यांना प्लास्टरखाली मगरी अडकलेली दिसली. या तरुणांनी प्लास्टर तोडण्यास सुरुवात करताच 3 मगरी जमिनीच्या आतून बाहेर येऊ लागल्या. हे पाहून तिथे उपस्थित लोकांचा थरकाप उडाला. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की शूज आणि लाल ड्रेस घातलेला एक व्यक्ती मगरीला नियंत्रित करण्याचा प्रयत्न करत आहे.
आणखी काही लोक मगरीला रोखण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. हे पाहिल्यानंतरही असं घडू शकतं यावर तुमचा विश्वास बसणार नाही.Viral 30 हून अधिक पाणघोड्यांनी घेरलं; एकटी मगर लढत राहिली अन्..शेवट पाहून व्हाल शॉक@mksinfo.official नावाच्या अकाऊंटवरून इन्स्टाग्रामवर शेअर केलेला हा व्हिडिओ 10 लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. त्याला 48 हजारांहून अधिक लोकांनी लाईक केलं आहे. प्लास्टरखाली मगरी कशा राहत होत्या हे पाहून लोक थक्क झाले. एका यूजरने म्हटलं की, याच्या खाली अजून काही लपलेल्या आहेत, असं वाटतंय. ते चांगलं खोदलं पाहिजे. हा व्हिडिओ धडकी भरवणारा आहे. दुसऱ्याने लिहिलं, तिथे एखादा लहान मुलगा असता तर काय झालं असतं.
0 Comments