LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील कामांची विभागीय आयुक्त कार्यालयाच्या पथकाकडून पाहणी

 

                                                      

पंढरपूर,  (उमाका) :- तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातंर्गत विकासकामांना गती देण्यासाठी पालखी मार्गावरील, पंढरपूर शहरातील सुरु असलेल्या तसेच नव्याने करण्यात येणाऱ्या  लोकोपयोगी विकास कामांचा  सर्वंकष आराखडा तयार करण्याबाबत विभागीय आयुक्त कार्यालयाच्या पथकाकडून  पालखी तळांची तसेच पंढरपूर शहरातील  विविध ठिकाणची पाहणी करण्यात आली.


यावेळी विभागीय आयुक्त कार्यालयाचे विशेष कार्यअधिकारी (तीर्थक्षेत्र विकास) राजेश तितर,  यांनी  पालखी मार्गावरील नातेपुते, कारुंडे, वेळापूर, उघडेवाडी, भंडीशेगांव  येथील पालखी तळ व विसाव्याची पाहणी केली. तसेच पंढरपूर येथील 65 एकर, चंद्रभागा नदीवरील घाट यांची पाहणी करुन माहिती घेतली.  यावेळी प्रांताधिकारी गजानन गुरव, तहसिलदार सुशिल बेल्हेकर, जगदीश निंबाळकर गटविकास अधिकारी प्रशांत काळे,मुख्याधिकारी अरविंद माळी, प्र. जिल्हा नियोजन अधिकारी पुंडलिक गोडसे, कार्यकारी अभियंता दत्तात्रय गावडे, महावितरणचे कार्यकारी अभियंता संजय गवळी, पोलीस निरिक्षक अरुण पवार, तसेच संबधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.



 


पालखी सोहळ्यासोबत येणाऱ्या भाविकांना तसेच पंढरपूरात येणाऱ्या भाविकांना  व स्थानिक नागरिकांना आवश्यक व दर्जेदार सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातर्गत नवीन समाविष्ट कामांना गती देण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी. आवश्यक ठिकाणच्या पालखी तळांवरील मुरमीकरण, स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सुविधा, विद्युतीकरण आदी कामांचा समावेश करुन पालखी तळ वापरायोग्य करण्यासाठीचे प्रस्ताव सादर करावेत. तसेच पालखी महामार्गाच्या रुंदीकरणामुळे भंडीशेगांव येथील सोपानदेव महाराज पालखी तळांची जागा सोहळ्यासाठी अपुरी पडत असल्याने भंडीशेगांव  येथील जलसंपदा विभागाच्या जागेचा ताबा घेण्यासाठी आवश्यकती पुर्तता करुन सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्याबाबतचे प्रस्ताव सादर करावेत. तसेच चांगावटेश्वर, चौरंगीनाथ महाराज पालखी वापरा योग्य करण्यासाठी पुर्तता करावी, अशा सूचना श्री. तितर यांनी यावेळी दिल्या.


यावेळी तीर्थक्षेत्र विकास अराखड्यातंर्गत शहरात तसेच  मंदीर व मंदीर परिसरात करावयाची  विकास कामे, पालखी तळ भूसंपादन व पालखी तळांवरील सोयी-सुविधा, वाहन तळ, घाट बांधणी, भीमा नदीपात्रातील नगरपालिका बंधारा वाढविणे, संत नामदेव स्मारकासाठी आवश्यक जागा आदी कामांबाबतची माहिती प्रांताधिकारी गजानन गुरव यांनी दिली.


Post a Comment

0 Comments