LOGO1

LOGO1














Ticker

    Loading......

ईश्वर वठार येथे एकास बेदम मारहाण.

 

पंढरपूर (प्रतिनिधी) :- पंढरपूर तालक्यातील ईश्वर वठार. येथे बोगस मतदान यादीच्या कारणावरून दोघांनी ज्ञानेश्वर गुडगे यांना बेदम मारहाण केली असून मारहाणीत जबर जखमी झालेल्या ज्ञानेश्वर याची पत्नी रेखा ज्ञानेश्वर गुंडगे वय 35 वर्षे  रा. ईश्वर वठार  यांनी पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.



गावचे मतदार यादीत काही लोकांचे नांवे इतर आसपास गावात तसेच गावातील मतदार यादीत देखील असल्याने  ज्ञानेश्वर  गुडगे यांनी हरकत घेतली होती. त्या कारणावरुन  गावातील संजय सरवदे, औंदूबर मेटकरी हे  ज्ञानेश्वर याचेवर चिडून होते. बुधवार   दि. 07डिसेंबर रोजी पहाटे 05वा   ज्ञानेश्वर यांना दोन लोकांनी मारहाण केली. मी •सोडविण्यासाठी गेले असता, माझे पतीस आमचे गावातील माझे तोंड ओळखीचे संजय सरवदे व ओटूबर मेटकरी है मारहाण करीत होते . त्याचे तावडीतून  ज्ञानेश्वर यांना सोडविण्यास  मी  गेली असता  औदूंबर मेटकरी याने करून बाजुला व्हा, असे म्हंटले  आवाज ऐकुन  मुलगी ज्योती ही घराबाहेर आली त्यावेळी तीलाही मारहाण केली. मुलगी ज्योती हीचे अंगावर ढकलून दिले त्यावेळी मुलगी ज्योती ही खाली पडली. औंदुबर मेटकरी व संजय सरवदे यांनी ज्ञानेश्वरांना खाली पाडुन मारहाण केली. मुलगी ज्योती हीचा ओरडण्याचा आवाज ऐकून बाजुच्या शेतात पिकाला पाणी देत असलेले ज्ञानेश्वर यांचे भाऊ रविंद्र गुडगे हे तेथे आले त्यावेळी संजय सरवदे याने बाजुस पडलेला दगड उचलुन , तुला जिवंत सोडत नाही असे म्हणत मारला तसेच औदूंबर मेटकरी याने दगड उचलून याला सोडु नको असे म्हणून हातातील दगड डोक्यात मारला परंतु  उजवा हात मध्ये घातल्याने औदुंबर याने मारलेला दगड  उजवे दंडावर लागला. 

यावेळी आरडा-ओरडा झाल्याने ते दोघेजण शिवीगाळी करून तु गावचे मतदान यादीमधील नावाबाबत हरकत घेतो काय तुला सोडत नाही .असे म्हणुन तेथून निघुन गेले.मारहाण करणारे लोक निघुन गेल्यावर  ज्ञानेश्वर यांना रक्ताची उलटी झाली. त्यावेळी मुलगी ज्योती हीने घरात झोपलेला मुलगा राजकुमार यास झोपेतून उठवून बाहेर बोलावुन आणून त्यास घडली हकिकत सांगीतली. मुलगा राजकुमार याने  गावातील विकास तरंगे यास फोन करून  त्यांना औषधोपचारासाठी पंढरपूर येथील दवाखान्यात घेवून जायचे आहे तुझी चारचाकी गाडी घेवुन ये असे सांगीतलेवर विकास तरंगे हा थोडया वेळातच त्याची जीप घेवुन आल्यानंतर ज्ञानेश्वर यांना उपचारासाठी लाईफ लाईन हॉस्पीटल पंढरपूर येथे आणून दाखल केले असून, सध्या त्यांचेवर उपचार चालु आहेत,  तरी, दि. आज दि.07 डिसेंबर रोजी पहाटे 05/00 वा. चे सुमारास आमचे घरासमोर 1) औदूंबर धोंडीबा मेटकरी 2) संजय लक्ष्मण सरवदे दोघे रा. ईश्वर वठार ता. पंढरपूर यांनी संगनमत करून  ज्ञानेश्वर गुडगे यांनी बोगस मतदान यादीतील नावाबाबत हरकत घेतल्याचे कारणावरून शिवीगाळी, जीवे ठार मारण्याचे उद्देषाने दगडाने पोटात उजवे दंडावर मारहाण करून जखमी केले तसेच  बायको ,मुलगी सोडवण्यास गेले असता, त्यांना धक्काबुक्की करून ढकलुन खाली पाडले आहे  अशी तक्रार पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात ज्ञानेश्वर याची पत्नी रेखा यांनी नोंदवली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments