विठ्ठल कारखान्याप्रमाणे नगरपालिका निवडणूकीचे नेतृत्व करा-दत्तात्रय बडवे-शिंदे
मागील काही दिवसांपूर्वी नगरपालिका आर्थिकदृष्ट्या अडचणीत सापडलेली आहे अशी बातमी वाचली होती. अनेक प्रकारच्या वसूल्या होत नसल्याचे विद्यमान मुख्याधिकारी यांनी कबूल केलेले आहे. मालमत्ताधारक, शॉपिंग सेंटर यांच्याकडून लाखो रूपयांची थकबाकी आहे. नगरपालिका निवडणूकीचे मागील 1 वर्षापासून वातावरण तयार झाले मात्र निवडणूक काही झाली नाही त्यामुळे त्या भागातील लोकप्रतिनिधी वसूलीसाठी कुणी वाईटपणा घ्यावा या भूमिकेतून या थकबाकीकडे अनेकांनी दुर्लक्ष केले अशा परिस्थितीत नगरपालिकेची विठ्ठल कारखान्याप्रमाणे अवस्था झालेली आहे. शासनाचे अनुदान आल्याशिवाय कर्मचाऱ्याचा पगार होत नाही अशी अवस्था नगरपालिकेची झाली आहे. कोणताही कर्मचारी खाते प्रमुख नगरपालिकेचे उत्पन्न वाढावे म्हणून प्रयत्न करताना दिसून येत नाही. तसेच लेट रिव्हीजन सुरू झाल्यामुळे नगरपालिकेला लाखो रूपयांचा फटका बसलेला आहे. अशा परिस्थितीमुळे नगरपालिका आर्थिकदृष्ट्या सबळ होण्यासाठी व स्वच्छ प्रशासन निर्माण होण्यासाठी विठ्ठल कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांनी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करावा व नगरपालिकेची निवडणूक कॉंग्रेसने स्वतंत्रपणे आपल्या नेतृत्वाखाली लढवावी.अशी विनंती सोलापूर जिल्हा कॉंग्रेस कमिटी ब्राह्मण सेलचे अध्यक्ष दत्तात्रय बडवे-शिंदे यांनी केलेली आहे.
कारण 2009 पासून कॉंग्रेस व राष्ट्रवादीचे दिवंगत आमदार भारतनाना भालके यांच्या नेतृत्वाखाली तिर्थक्षेत्र विकास आघाडीबरोबर आम्ही प्रचार कार्य केले व तद्नंतर निवडणूका झाल्यावर सत्ता आल्यानंतर व गेल्यानंतरही नुकतीच भगिरथ भालके यांच्या घरी नुकत्याच झालेल्या समविचारी आघाडीच्या बैठकीचे साधे आमंत्रणही देण्यात आले नाही, विश्वासात घेत नाहीत व पालकमंत्री आल्यानंतर कळवत ही नव्हते. आमच्या प्रश्नाकडे जाणुनबुजून दुर्लक्ष केले मार्गी लावले नाहीत. त्यामुळे पंढरपूरच्या कॉंग्रेसला सक्षम नेतृत्वाअभावी मरगळ आलेली आहे. त्यातच माजी तालुकाध्यक्ष प्रकाशतात्या पाटील यांची जिल्हा कमिटीत रवानगी झाल्यामुळे त्यांनी पंढरपूरच्या कॉंग्रेस पक्षाकडे दुर्लक्ष केले त्यामुळे पंढरपूरच्या कार्यकर्त्याला ऊर्जा मिळत नाही. तरी ऊर्जेच्या रूपाने अभिजीत पाटील यांनी कॉंग्रेसमध्ये यावे व पंढरपूर नगरपालिका निवडणूकीचे नेतृत्व करावे अशी विनंती दत्तात्रय बडवे-शिंदे यांनी केली आहे.
0 Comments