LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

जिल्हा नियोजन समिती अंतर्गत ७ कोटी १२ लाख रुपयांचा निधी उपलब्ध



पंढरपूर/ प्रतिनिधी – शहर व परिसरातील विविध विकांस कामांसाठी जिल्हा नियोजन समिती अंतर्गत ७ कोटी १२ लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला असल्याची माहिती माजी आमदार प्रशांत परिचारक परिचारक यांनी दिली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या माध्यमातून जिल्हा नियोजन समिती मधून २०२२-२३ साठी पंढरपूर शहर परिसरातील रस्ते खडीकरण, डांबरीकरण व अग्निशमन इमारत बांधकाम आदी कामांसाठी ७ कोटी १२ लाखांचा निधी उपलब्ध झाला असल्याची माहिती माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी दिली.

यात एम.एस.ई.बी.ऑफीस ते तनपुरे महाराज मठ ते कन्या प्रशाला रस्ता खडीकरण डांबरीकरण,भक्त निवास ते स्टेशन रोड रस्ता खडीकरण डांबरीकरण,प्रशांत परिचारक नगर मधील अंतर्गत रस्ते खडीकरण डांबरीकरण,गट नं.१०० कासेगाव ते कचरा डेपो रस्ता खडीकरण डांबरीकरण, विठ्ठल नगर,मानस नगर,येळे वस्ती येथील अंतर्गत रस्ते खडीकरण डांबरीकरण, गुरूदेव नगर येथील अंतर्गत रस्ते खडीकरण डांबरीकरण,मनिषा नगर कुंभार घर ते सयाजी आसबे घर रस्ता खडीकरण मुरमीकरण, पद्मनाथ मंगल कार्यालय ते सुनिल पाटील मळा ते एकता नगर रस्ता खडीकरण डांबरीकरण, पवार वस्ती ते पश्चिमेकडे वांगीकर नगर जाणारा रस्ता खडीकरण डांबरीकरण या रस्त्यासाठी एकूण ५ कोटी २२ लाख रूपये मंजूर झाला आहे.

दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत सन २०२२- २३ भिंगे चौक ते वैभव हार्डवेअर शॉप रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे, अग्निशमन कार्यालय परिसर ट्रॅक रोड विकसित करणे, गणपती हॉस्पिटल ते टकले हॉस्पिटल नविन कराड नाका रस्ता खडीकरण डांबरीकरण याकामासाठी १ कोटी १६ लाख रूपये निधी मंजर झाला आहे. जिल्हा स्तरावरून सन २०२२-२३ अग्निशमन इमारत उर्वरित बांधकाम पूर्ण करण्यासाठी ७३ लाख ९० हजार रूपये मंजूर झाला आहे.

याबरोबरच काही ठिकाणी केवळ खडीकरण झाले आहे मात्र पुढील काम बंद पडले आहे तेही सुरू व्हावे अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

Post a Comment

0 Comments