LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

पंढरपूर येथे मा.आ.प्रशांत परिचारक यांच्या नेतृत्वाखाली स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रा संपन्न.

 



पंढरपूर ( प्रतिनिधी)पंढरपूर येथे आज बुधवार दिनांक ५ एप्रिल रोजी स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रा नामदेव पायरी येथून स्वातंत्र्यवीर सावरकर चौक येथे काढण्यात आली. यामध्ये माजी आमदार श्री प्रशांत परिचारक यांच्यासह भा ज पा, रा स्व संघ, हिंदू महा सभा पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. या यात्रेत भा ज पा शहर उपाध्यक्षा डॉ प्राजक्ता बेणारे, पार्थ बेणारे , माऊली हळणवर, सुभाष मस्के, प्रशांत सापनेकर आदी सहभागी झाले होते. यावेळी स्वातंत्र्यवीर सावरकर चौक येथे जाहीर सभेच्या आयोजन करण्यात आले होते. व्यासपीठावर पंढरपूर अर्बन बँकेचे अध्यक्ष सतीश मुळे माजी नगराध्यक्ष लक्ष्मण पापरकर, भा ज पा तालुकाध्यक्ष भास्कर कसगावडे , युवा नेते प्रणव परिचारक,माजी नगरसेवक अनिल अभंगराव, मोहनराव मंगळवेढेकर, डॉ जोशी,बाळासाहेब बडवे, शिवसेना शिदे गटाचे शिवाजी बाबर, बालाजी बागल, पांडुरंग घंटी,शैलेश बडवे, आदी मान्यवर उपस्थित होते.

या सभेत बोलताना मा.आ. प्रशांत परिचारक म्हणाले, काँग्रेस पक्षाच्या सर्व लोकांना स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपूर्व,त्याग, देशासाठी दिलेले बलिदान,देश स्वतंत्र करण्यासाठी केलेले योगदान माहीत आहे,पण जाणीवपूर्वक जातीय तेढ निर्माण करण्यासाठी भा ज पा सरकार सत्तेत आल्यापासून असे बोलले जाते, टीका करणाऱ्यांची तेवढी लायकी सुद्धा नाही. असे राजकारण सध्या सुरू आहे,याला लोकांनी बळी पडू नये यासाठी राज्यभरात स्वातंत्र्यवीर वि दा सावरकर गौरव यात्रा काढण्यात येत आहे.आज कैलासवासी वसंत बाबाजी बडवे, भगवताचार्य वा ना उत्पात,प्रकाश दादा उत्पात ही  सावरकर प्रेमी लोक हयात असती तर खूप धन्यता वाटली असती.यावेळी हिंदू महा सभेचे अभयसिंह इचगावकर , विधीज्ञ तुकाराम चिंचणीकर यांनी मनोगत व्यक्त केले.प्रास्ताविक माजी नगरसेवक ऋषिकेश उत्पात यांनी केले. आभार अक्षय वाडकर यांनी मानले.सूत्रसंचालन माजी नगरसेवक अनिल अभंग राव यांनी केले.

Post a Comment

0 Comments