LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

पंढरपूर आय एम ए यांच्या वतीने वारकऱ्यांसाठी मोफत आरोग्य शिबीर संपन्न.

 पंढरपूर (प्रतिनिधी) सावल्या विठुरायाच्या दर्शनासाठी आषाढी एकादशी निमित्त पंढरपूर येथे शेकडो किमी अंतरावरून चालत येणाऱ्या भाविकांसाठी पंढरपूर आय एम ए व राज्य आय एम ए यांच्या वतीने पंढरपूर येथील इसबावी विसावा श्री विठ्ठल मंदिर परिसरात मोफत आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले होते.

या शिबिराचा लाभ सुमारे ४ ते५ हजार भाविकांनी घेतला.

आय एम ए पंढरपूर चे अध्यक्ष डॉ पंकज गायकवाड व काणेज सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल चे डॉ सुरेंद्र काणे, डॉ अमित गुंडेवार यांच्या विशेष सहकार्याने सोलापूर येथील डॉ रविराज पवार व त्यांचे साथीदार डॉक्टर यांनी आरोग्य तपासणी, उपचार केले.

आरोग्य शिबीराचे उद्घाटन डॉ पंकज गायकवाड यांनी केले.

गुडघे दुखी,पोटदुखी,उलट्या,जुलाब, ताप, सर्दी, खोकला,पडसे, नेत्र विकार, स्त्री रोग आदी सर्व व्याधींवर उपचार करण्यात आले.

उत्तम आरोग्यासाठी आवश्यक सूचना, पथ्य पाणी,आहार, विहार यांची माहिती देण्यात आली.

शिबिर यशस्वी करण्यासाठी काणेज हॉस्पिटल चे को - ऑर्डीनेटर विश्वास पाटील, अतुल अवसेकर, विनोद सुरवसे यांनी अथक परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments