LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

विदर्भातील साडे चारशे महिला भाविकांनी नदीचे वाळवंट केले चकाचक. शेकडो टन कचरा काढला.

 


पंढरपूर (प्रतिनिधी)पंढरपूर येथील चंद्रभागा नदीचे वाळवंट विदर्भ येथील सुमारे ४५० महीला भाविकांनी स्वच्छ झाडून शेकडो टन कचरा गोळा केला . गुरुवार दि. ६ जुलै रोजी सकाळी अकरा वाजता लाल रंगातील शेकडो महिला भाविक हातात झाडू, खराटे घेऊन परिसर स्वच्छ करण्यात मग्न होत्या. शिरपूर(जैन) ता.मालेगाव, जि. वाशिम येथील या महिला भाविक असून आषाढी वारी साठी त्या पंढरपूर येथे वास्तव्यास आहेत. 

या महिलांनी संपूर्ण वाळवंट परिसर आणि नदीतील कपडे, जीर्ण व फुटलेल्या मूर्ती, देवी देवतांच्या तसबिरी काढून सफाई केली. ह भ प नामदेव महाराज लबडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. दिंडीप्रमुख रवी पुरी यांनी नियोजन केले होते.

यावेळी, रवी पुरी म्हणाले, आषाढी वारी झाल्यावर वाळवंट आणि नदी पात्रात मोठ्या प्रमाणात राडारोडा, कचरा साठला होता. श्री विठ्ठलाची सेवा म्हणून आम्ही दरवर्षी असे कार्य करतो. आमचे वास्तव्य पंढरपूर येथे अजून पाच दिवस आहे. या काळात आम्ही श्री संत तुकाराम महाराज मठ, श्री संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर, श्री संत मुक्ताबाई मठ, श्री संत गाडगे महाराज धर्मशाळा या ठिकाणी जाऊन स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे असे रवी पुरी म्हणाले.

Post a Comment

0 Comments