LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

नाभिक दुकानदार संस्थेकडून ई श्रम- कार्ड शिबिर संपन्न

नाभिक दुकानदार बहुउद्देशीय संस्था, सोलापूर* यांच्या वतीने सोलापूर शहर - जिल्ह्यातील सर्व नाभिक सलून दुकानदार मालक, कामगार व फिरून व्यवसाय करणारे (सर्व पोट जातीसह) यांची असंघटित कामगार म्हणून महाराष्ट्र शासन दरबारी नोंद व्हावी याकरिता प्रत्येक सलून कारागिरांचे ई श्रम - कार्ड असणे आवश्यक आहे. त्यामुळे संस्थेच्या वतीने अल्पदरात *" भव्य ई श्रम कार्ड शिबिराचे "* आयोजन दि.12/8/ 2023 वार - शनिवार वेळ - सकाळी - 11 ते ४ वाजेपर्यंत श्री.शिवशंकर मंगल कार्यालय, जुळे सोलापूर येथे करण्यात आले होते. यावेळी सर्वप्रथम सर्व मान्यवरांच्या हस्ते *नाभिक समाजाचे आराध्य दैवत श्री. संत सेना महाराज* यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. व त्यानंतर *संस्थेचे जेष्ठ मार्गदर्शक मा.श्री. पांडुरंग चौधरी सर* यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सोलापूर शहर जिल्ह्यातील सर्व  नाभिक सलून दुकानदारांची असंघटित कामगार म्हणून महाराष्ट्र  शासन दरबारी लवकरच नोंद करून सर्वांना शासनाचे फायदे मिळवून देऊ असे आश्वासन दिले. *युवकांचे श्रद्धास्थान मा.श्री.वैभव शेटे सर* यांनी संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी एक दिलाने काम करून नाभिक सलून दुकानदारांसाठी नवनवीन उपक्रम राबवावेत असे सूचित केले. व तसेच *संस्थेचे अध्यक्ष - मा.श्री. प्रभाकर भालेकर* यांनी या ई श्रम कार्ड शिबिरासाठी सोलापूर शहर जिल्ह्यातील नाभिक सलून दुकानदारांनी खूपच मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिल्याबद्दल आभार व्यक्त केले. *संस्थेचे सचिव-श्री.श्रीकांत राऊत* बोलताना म्हणाले की, आज एका दिवसात सर्व नाभिक सलून कारागिरांचे ई श्रम - कार्ड तयार होणे शक्य नसल्याने संस्थेच्या वतीने टिळक चौक, विडी घरकुल,पार्क चौक या भागामध्ये टप्याटप्याने ई श्रम-कार्ड शिबिर घेऊ असे आश्वासित केले. *संस्थेचे खजिनदार श्री. संतोष राऊत* यांनी सांगितले की इतर ठिकाणी ई श्रम- कार्ड तयार करण्यासाठी शंभर रुपये घेतले जातात परंतु संस्थेकडून फक्त 40 रुपये मध्ये तयार करुन दिल्याचे स्पष्ट केले. यावेळी *कोअर कमिटीचे प्रमुख - श्री. विजय माने सर, श्री. संतोषभाऊ धोत्रे, श्री. संजय चिखले, श्री. गणेश वाघमारे, अॕड श्री. विकास तिर्हेकर, श्री. गणेश दळवी* यांची प्रमुख उपस्थिती लाभली. तसेच या *संस्थेचे उपाध्यक्ष- श्री.बापुराव काळे, सहसचिव - श्री.प्रकाश शिंदे,कार्याध्यक्ष - श्री. भारतभाऊ शिंदे,प्रसिद्धी प्रमुख - श्री.सचिन चौधरी सर, संचालक - श्री.मनोज डिगे,संचालक- श्री. प्रभाकर राऊत, संचालक - श्री.आनंद वाघमारे,संचालक - श्री.सोमनाथ हळदे, उपाध्यक्ष-श्री.शरणु हडपद,संचालक-श्री. सिद्धाराम हडपद* यांनी अथक परिश्रम घेतले. तसेच *विभागीय अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, खजिनदार* यांनी अनमोल असे सहकार्य केले. या कार्यक्रमाचे *सूत्रसंचलन संस्थेचे सचिव-श्रीकांत राऊत* यांनी व *आभार प्रदर्शन कार्याध्यक्ष - श्री. भारतभाऊ शिंदे* यांनी केले.यावेळी श्री.सचिन (मालक)धोञे, श्री.शिल्लीसिध्द राऊत ,दिलीप कोरे,रामदास राऊत,विश्वजीत कासविद तसेच नाभिक सलुन दुकानदार मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments