आदिवासी कोळी महादेव, टोकरे कोळी , मल्हार कोळी या अनुसूचित जमातीच्या जळगाव येथील समाज बांधवांच्यवतीने गेली 26 दिवस अन्नत्याग आमरण उपोषण छेडण्यात आले होते . त्याच अनुषंगाने 20 ऑक्टोबर 2023 रोजी माननीय मुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली व माननीय आमदार रमेशदादा पाटील यांच्या प्रयत्नाने आदिवासी विकास व अनुसूचित जमातीतील प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत एक बैठक आयोजित करून यासंदर्भात महत्वाची चर्चा करण्यात आली होती .
कोळी नोंदीवरून सरसकट कोळी समाजाला जातीचे प्रमाणपत्र व रक्त नात्याच्या पुराव्यावरनं वैधता प्रमाणपत्र देण्यात यावे ... या मागणीसाठी शासनाने जीआर काढण्याचे बैठकीत निर्णय घेऊन कोळी समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न करण्यात आला होता .. त्याच बैठकीचे मिनिट्स कॉफी घेऊन माननीय मंत्री श्री . गुलाबरावजी पाटील व आमदार श्री रमेशदादा पाटील यांनी आज जळगाव येथे जाऊन उपोषणकर्त्यासोबत चर्चा करून सरकार आपल्या बाजूने सकारात्मक निर्णय घेण्यास तयार आहे .. तरी आपण उपोषण मागे घ्यावे ... आमदार रमेशदादा पाटील यांच्या विनंती वरून उपोषणकर्त्यांनी आज जळगाव येथील चालू असलेले अन्नत्याग उपोषण मागे घेतले .


0 Comments