कै.महादेव दादा वाघमारे यांना खोट्या गुन्ह्यात नाव टाकून शहनिशा न करता अटक केली मारहाण केली. आणि काही दिवसात न्यायालीन कस्टडीत असताना त्यांचा मृत्यू झाला होता.
या दरम्यान सिव्हिल हॉस्पिटल सोलापूर येते अंदोलन झालं व उपविभागीय पोलीस अधिकारी यांना निवेदन दिले होते. त्यावेळी चौकशी करून संबंधीता वर गुन्हा दाखल करतो असे आश्वासन दिले. परंतु आज पर्यत कोणतेही चौकशी झाली नाही. मारहाण करणारे पोलीसा वर गुन्हा दाखल झाला नाही. मयत महादेव दादा वाघमारे यांच्या कुटुंबाना अजून ही न्याय मिळाला नाही..
या करिता पंढरपूर शहर, पंढरपूर तालुका, सोलापूर शहर, व सोलापूर ग्रामीण मधील समस्त मातंग समाजाची प्रमुख नेते, पुढारी,अध्यक्ष, पदाधीकारी, कार्यकर्ते, यांची बैठक आयोजित केली आहे.मातंग समाजातील सर्व संघटना, राजकीय पक्ष,बाजूला ठेऊन फक्त समाजा करिता व मयत महादेव दादा वाघमारे यांच्या कुटुंबाना न्याय मिळणे करिता. पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी विचारविनिमय बैठक आयोजित केली आहे. तरी मातंग समाजातील सर्व प्रमुख पदाधीकारी, कार्यकर्ते यांनी सकल मातंग समाज ह्या बॅनर खाली उपस्थित राहावे अशी नम्र विनंती..

0 Comments