LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

श्री.रामलल्लाची प्राण प्रतिष्ठापना संपन्न

पंढरपूर (ता.26) :- श्रीराम जन्मभूमी अयोध्येत दिनांक २२ जानेवारी, २०२४  रोजी श्री.रामलल्लाची प्राण प्रतिष्ठापना संपन्न झाली. त्यानिमित्ताने देशभर दिवाळी साजरी करण्यात आली. तसेच श्री.विठ्ठल रूक्मिणी मंदिरात देखील विविध कार्यक्रम कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. त्यादिवशी श्री.विठ्ठल सभामंडप येथे मंदिर समितीच्या सदस्या श्रीमती शकुंतला नडगिरे व विभाग प्रमुख श्री.ज्ञानेश्वर कुलकर्णी या कारसेवकांचा कार्यकारी अधिकारी श्री.राजेंद्र शेळके यांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला.

अयोध्या येथे रामजन्मभूमी मुक्ती साठी झालेल्या कार सेवेत शकुंतला नडगिरे व ज्ञानेश्वर कुलकर्णी यांनी आपले योगदान दिले होते. श्रीमती नडगिरे ह्या मंदिर समितीवर सदस्या म्हणून व श्री कुलकर्णी हे विभाग प्रमुख म्हणून आस्थापनेवर कार्यरत आहे.

त्या दिवशी अयोध्येत हजारो कारसेवकानी ढाच्याकडे कूच करून, पोलिसांच्या गोळ्या व लाठ्या झेलून जय श्रीराम च्या घोषात घुमटावर चढून अभिमानाने भगवा झेंडा रोवला होता. अयोध्येत पोहचल्यानंतर घटनेदिवशी मोठ्या प्रमाणात कारसेवक होते व जय श्रीरामच्या घोषणा देऊन बाबरीकडे कुच करीत होते. त्यामध्ये महिला कारसेवक सर्वात अग्रभागी होत्या व मी त्यावेळी 3 दिवस तुरुंगवास देखील भोगला असल्याचे श्रीमती नडगिरे यांनी सांगीतले.

माझ्या हातून भगवान श्री.रामाची सेवा घडली हे माझे भाग्यच. मंदिर वही बनायेंगे हे आमचे घोषवाक्य पंतप्रधान श्री.नरेंद्रजी मोदीसाहेब यांनी श्री रामलल्लाचे मंदिर पुनर्स्थापित करून मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना करून आमचे स्वप्न साकार केल्याचे श्री ज्ञानेश्वर कुलकर्णी यांनी शेवटी सांगितले.

Post a Comment

0 Comments