LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

राजकीय सूडबुद्धीने अभिजीत पाटील व संचालक मंडळावर कारवाई, राज्य सहकारी बॅंकेचा शेतकरी सभासदांकडून निषेध



प्रतिनिधी/-

पंढरपूरचे राष्ट्रवादीचे नेते व श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील यांच्या समर्थनार्थ आज (गुरुवार) साखर कारखान्याच्या सभासद व कामगार, त्यांच्या कुटुंबियानी कारवाईच्या विरोधात काळ्या फिती लावून व बँकेने दिलेल्या नोटीशीची होळी करुन निषेध व्यक्त करण्यात आला.

पंढरपूर येथील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील व त्यांच्या संचालक मंडळावर राज्य सहकारी बँकेने फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे. बॅंकेने केलेल्या या कारवाईच्या निषेधार्थ व अभिजीत पाटील यांच्या समर्थनार्थ पंढरपूर तालुक्यातील शेकडो शेतक-यांनी आज एकत्रित येत कारखान्यावर आंदोलन केले. थकीत रक्कम वसूल करण्यासाठी राज्य सहकारी बँकेने संचालक मंडळावर गुन्हा दाखल केला. या कारवाईचे तालुक्यात पडसाद उमटले आहेत. बॅंकेला हाताशी धरून राज्य सरकारने राजकीय सुड बुध्दीने ही कारवाई केली आहे.

ही कारवाई तातडीने मागे घ्यावी अन्यथा या कारवाईच्या विरोधात संचालक मंडळासह शेतकरी तीव्र आंदोलन करतील असा इशारा कारखान्याचे संचालक प्रा. तुकाराम मस्के व ॲड.दिपक पवार यांनी दिला आहे.

दि.२५जानेवारी रोजी विठ्ठल कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील सभासदांनी सुस्ते,पांढरेवाडी, शेळवे, खेडभाळवणी, गुरसाळे,पिराची कुरोली, बोहाळी, अनवली, तारापूर, कोंढारकी, उंबरगाव, चळे यासह अनेक गावोगावी जाहीर निषेध केला..

यावेळी ज्येष्ठ सभासद बिभीषण पवार, ज्येष्ठ कल्याण बप्पा पाटील, ॲड. दिपक पवार, अमर पाटील, तानाजी बागल, शिवसेना (ठाकरे गट) नेते रणजित बागल, कोरके, संदिप मांडवे, अंगद चिखलकर, रामचंद्र वाघ, ईश्वर सुरवसे, रमाकांत पाटील, सचिन पाटील, मधुकर बागल, बाळासाहेब यलमार, पोपट पाटील, मधुकर गिड्डे, हणमंत पाटील, दत्ता नागणे, सुरेश घाडगे, दत्तात्रय पवार, गजेंद्र पवार, कुलदिप कौलगे, श्रीनिवास भोसले, युवराज भिंगारे, आण्णा महाराज भुसनर, बाबासाहेब काळे, शहाजान शेख, किरण घोडके, दत्ताआण्णा बागल, जोतीराम देठे, दशरथ जाधव, गणेश ननवरे, उमेश मोरे, शहाजी मुळे, बंडू काटे, विठ्ठल पाटील, महेश खटके, सचिन अटकळे, सागर गोडसे यासह असंख्य सभासद, कर्मचारी उपस्थित होते...

Post a Comment

0 Comments