श्री नागनाथ मूकबधिर निवासी विद्यालय बाभुळगाव येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा श्री नागनाथ मूकबधिर निवासी विद्यालय बाभुळगाव तालुका पंढरपूर येथे 75 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पासले रावसाहेब पंढरपूर हे होते तर या कार्यक्रमासाठी एस व्ही शिर्के पाटील पंढरपूर व एस जी अँड कंपनीचे मालक बोहरी साहेब पंढरपूर श्याम तापडिया श्री अरुण बन गोसावी श्री कंकमवार श्री बोडके साहेब श्री हत्ता करणे साहेब तसेच रमेश तात्या चव्हाण बाबुळगाव संस्थेचे सचिव मा श्री चित्रसेन पाथरूट सर पालक प्रतिनिधी अनिल लोखंडे सुरेश रणदिवे तसेच माजी विद्यार्थी आदी मान्यवर उपस्थित होते प्रमुख मान्यवरांच्या हस्ते महात्मा गांधी व संस्थेचे संस्थापक आदरणीय कै काशिनाथ पाथरुट गुरुजी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले तर कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री पासले साहेब यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले या कार्यक्रमानिमित्त विद्यालयाच्या प्रांगणात भव्य सजावट करण्यात आली होती सर्व उपस्थित मान्यवरांचे स्वागत सत्कार संस्थेचे सचिव मा श्री चित्रसेन पाथरूट सर व शाळेचे मुख्याध्यापक श्री भोसले सर यांनी केले यावेळी शाळेतील मूकबधिर मुलांनी कवायतीचे उत्कृष्ट असे सादरीकरण करून उपस्थित मान्यवरांचे मने जिंकले तसेच माननीय श्री अरुण बन गोसावी देगाव यांच्यातर्फे मूकबधिर मुलांना गणवेश वाटप करण्यात आले त्याचबरोबर माननीय श्री शिर्के पाटील हार्डवेअर व मा एस जी बोहरी आणि कंपनी पंढरपूर यांच्या ग्रुप तर्फे शाळेतील मुलांना गरम पाण्याचे सोलर देऊन त्याचे उद्घाटन करण्यात आले यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांनी मूकबधिर विद्यार्थ्यांना शिकवण्याच्या पद्धती जाणून घेतल्या व वसतिगृहातील सुविधा बाबत कौतुक केले तसेच शाळेतील सर्व सुख सुविधा बाबत व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्या कुशल कार्याबद्दल समाधान व्यक्त केले तसेच यापुढे या शाळेसाठी भविष्यात आणखी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले प्रजासत्ताक दिनानिमित्त बाभुळगाव येथील प्रगतशील बागायतदार मा श्री रमेश तात्या चव्हाण यांनी मुलांना निष्ठांना भोजन दिले तसेच बाभुळगाव येथील महेश शंकर कथले सर संस्थापक अध्यक्ष तेजस इंग्लिश स्कूल बाभूळगाव यांच्यातर्फे मुलांना घसरगुंडी देऊन मूकबधिर मुलांचा आनंद द्विगुणीत केला सूत्रसंचालन श्री गुजलवार यांनी केले तर आलेल्या सर्व पाहुण्यांचे आभार आपल्या संस्थेचे प्रशासक मा श्री महादेवराव खरसडे सर यांनी मानले


0 Comments