पंढरपूर : पंढरपूर एज्युकेशन सोसायटीच्या द. ह. कवठेकर प्रशालेने निसर्ग - पर्यावरण व वसुंधरा यांचे रक्षण व संवर्धनाचा संदेश देणारा कार्यक्रम 'निसर्गराजा' हा नुकताच सादर केला. या कार्यक्रमास प्रमुख अभ्यागता म्हणून पंढरपूर अर्बन बँकेच्या व्हाईस चेअरमन सौ. माधुरी जोशी, संचालिका डॉ. सौ. संगीता पाटील, ज्येष्ठ शिक्षिका सौ. वैशाली पटवर्धन मॅडम, पंढरपूर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्री. नाना मालक कवठेकर, सचिव श्री. एस. आर. पटवर्धन सर, पदाधिकारी श्री. एस. पी. कुलकर्णी सर, डॉ.श्री. मिलिंद जोशी, श्री. संजय कुलकर्णी, श्री. अभिषेक सातारकर, शिक्षक पालक संघाच्या उपाध्यक्ष श्री मंदार लोहकरे, सहसचिवा सौ. दिपाली सतपाल, पदाधिकारी डॉ.अभिजीत खुपसंगीकर, डॉ. निशा कलढोणे, कवठेकर प्रशालेचे मुख्याध्यापक व्ही. वाय. पाटील सर उपस्थित होते.
प्रारंभी प्रशालेचे मुख्याध्यापक श्री.व्ही.एम. कुलकर्णी सर यांनी पर्यावरण रक्षण हा कार्यक्रमाचा उद्देश प्रस्ताविकात केला. यावेळी प्रमुख अभ्यागता सौ. माधुरी जोशी, सौ. संगीता पाटील व श्री एस. आर. पटवर्धन सर यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले व कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमात 600 बालकालाकारांनी आपला कलाविष्कार सादर केला. यावेळी प्रशालेतील बालकलाकारांनी वाऱ्यावरती गंध... हिरव्या हिरव्या रंगाची... आला आला वारा... गोमू माहेरला जाते... वादळ वारं सुटलं ग... काय सांगू राणी... मन उधान वाऱ्याचे... देवा काळजी रे... अग्गोबाई ढग्गोबाई.. यासारख्या गीतावर ठेका धरला व एक निसर्ग व पर्यावरण संरक्षणाचा संदेश आपल्या नृत्याविष्कारातून दिला. कार्यक्रमाची सांगता प्रभू रामचंद्र यांच्या वनवास परतीनंतरच्या आनंद उत्सवाने झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशालेचे मुख्याध्यापक श्री.व्ही.एम. कुलकर्णी सर यांनी केले. उपस्थितांचे आभार उपमुख्याध्यापक श्री. आर.जी. केसकर यांनी व्यक्त केले. पर्यवेक्षक श्री मुंडे सर यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले. ज्येष्ठ शिक्षक श्री राजेश खिस्ते सर यांनी निवेदन केले. कार्यक्रमातील संपूर्ण तंत्र व नेपथ्य विभाग कलाशिक्षक श्री. अमित वाडेकर यांनी सांभाळा. शाळेतील सर्व शिक्षक बंधू-भगिनी व शिक्षकेतर कर्मचारी बंधू यांचे मोलाचे सहकार्य लाभले.


0 Comments