पंढरपूर प्रतिनिधी : येथील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे सोलापूर जिल्हा उपप्रमुख सुधीर भाऊ अभंगराव यांच्या मार्गदर्शनाखाली समाजसेवक विजय मामा अभंगराव यांच्या संकल्पनेतून पंढरपूर येथील अंबाबाई पटांगण या ठिकाणी यंग स्टार क्रिकेट क्लब पंढरपूर यांच्या वतीने युवा चषक 2024 भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. युवराज साईनाथ अभंगराव यांच्या वाढदिवसानिमित्त सदर सामने भरवण्यात आले आहेत.
रविवार दिनांक 11.2.2024 पासून गुरुवार दिनांक 15. 2. 2024 पर्यंत या सामन्यांचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेमधील विजेत्या संघास 1 लाख 30 रुपये पारितोषिक तर द्वितीय 70 हजार 30 रुपये तर तिसऱ्या क्रमांकाच्या विजेत्या संघास 50 हजार 30 रुपये मिळणार आहेत सदर स्पर्धेत भाग घेण्यासाठी संपर्क साधण्याचे आयोजन यंग स्टार क्रिकेट क्लब पंढरपूर यांच्या वतीने करण्यात आले आहे सदर सामने पंढरपूर येथील अंबाबाई पटांगण या ठिकाणी खेळवले जाणार आहेत.


0 Comments