सर्वत्र लवकरच ग्रामदेवताच्या यात्रेंना प्रारंभ
संभाजी पुरीगोसावी ( सातारा जिल्हा ) प्रतिनिधी. सध्या आता एप्रिल महिन्यांला प्रारंभ होत असून एप्रिल आणि मे महिन्यांमध्ये ग्रामदेवतांच्या वार्षिंक यात्रेस प्रारंभ होत असतो. यात्रेकाळात पै.पाहुण्यांचे मनोरंजन म्हणून गावच्या यात्रा कमिटीच्या वतीने तमाशा ऑर्केंस्ट्रा अशा विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे नियोजन करण्यात येते असते. पुणे जिल्ह्यातील कडेगांव चौफुला आणि फलटण तालुक्यांतील काळज हे तमाशा कलावंतांचे केंद्रबिंदू म्हणून ओळखले जाते. फलटण तालुक्यांमध्ये काळज या गावात देखील अनेक तमाशा कलावंतांचे फड दाखल होणयास सुरुवात होते आहे. यामध्ये साहेबराव नांदवळकर, रघुवीर खेडकर,मास्टर सूर्यकांत चंदकांत वरळीकर,सौ. शांता लता पंढरपूरकर, सौ. गीतांजली सातारकर, दौलतराव खिलारे पडळसकर, मास्टर तानाजी भोसले वाघेरीकर, मास्टर भिका भीमा सांगवीकर, यांच्यासह विविध तमाशा कलावंतांनी केंद्रबिंदू असणाऱ्या कडेगांव चौफुला आणि काळज मध्ये आपले तंबू उभारले आहेत.


0 Comments