संभाजी पुरीगोसावी (पुणे जिल्हा) प्रतिनिधी. बहिणीशी असलेल्या प्रेम संबंधातून बारामतीतील तरुणाला बेदम मारहाण करून त्याचा खून केल्याचा धक्कादायक घटना बिबवेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये घडली आहे. पोलिसांनी दाखल असलेल्या आकस्मित मृत्यूच्या गुन्ह्याच्या सखोल तपास करून या खुनाचा छडा लावला आहे. तसेच तरुणीच्या पतीसह अल्पवयीन साथीदारांवर गुन्हा दाखल केला आहे या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे संग्राम हनुमंत साळुंखे ( वय २२) रा. वडकेनगर बारामती जि. पुणे) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी नितिन रेणुसे आदित्य गवळी अनिकेत चव्हाण यांच्यासह दोन अल्पवयीन साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस सूत्रांकडूंन मिळालेल्या माहितीवरून संग्राम साळुंखे यांचे धनकवडीतील आंबेगाव पठार परिसरांतील राहणाऱ्या एका विवाहित तरुणीशी ओळख झाली होती. त्यानंतर या दोघांचेही रूपांतर प्रेम संबंधा पर्यंत पोहोचले, मात्र या दोघांचे प्रेम संबंध तरुणीच्या पतीला समजले होते. यावेळी संग्राम हा विवाहित तरुणीला भेटण्यास पुण्यात येणार असल्यांचे पतीला समजले होते. तो बिबवेवाडी किया सर्विसेस सेंटरजवळ दिनाक २ डिसेंबर २०२३ रोजी आला होता. त्यावेळी आरोपींनी देखील चांगलीच पाळत ठेवूली होती. अखेर पत्नीच्या प्रियकराला म्हणजे च... संग्राम अखेर गाठले, प्रथमता त्याला चाकीवरून बसून अप्पर इंदिरानगर परिसरातील गॅस गोदामाजवळ नेले तेथे त्याला बेदम मारहाण केली. या मारहाणीत संग्राम हा गंभीर जखमी झाला होता. त्यानंतर त्याला तिथेच सोडून आरोपी पसार झाले होते. दरम्यान संग्रामला रुग्णालयात दाखल केले असता उपचारांदरम्यान त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. बिबवेवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकर यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि.निकुंभ यांनी साक्षीदार व इतर तपास केल्यानंतर या खुनाचा प्रकार उघडकीस आला पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शशांक जाधव करीत आहेत.


0 Comments