संभाजी पुरीगोसावी ( सातारा जिल्हा ) सध्या आगामी लोकसभा निवडणुकीचे वारे चांगलेच वाहत आहे. तसेच आचारसंहितेच्या काळात आणि आगामी येणाऱ्या धार्मिंक सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पुसेगांव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष कांबळे यांनी वरिष्ठांच्या आदेशावरुन पोलीस ठाण्याच्या वतीने कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पुसेगांव पोलिसांचा पुसेगांव शहरांतून तसेच ग्रामीण भागातील खटाव डिस्कळ ललगुण वर्धनगड अशा विविध ग्रामीण भागातील गावांमधून रूट मार्च काढण्यात आला. सदरचा रूट मार्च हा पुसेगांव पोलीस ठाण्यापासून ते छत्रपती शिवाजी चौक ते फलटण चौक बसस्थानक सेवागिरी महाराज मंदिरापासून तसेच पुसेगांव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ग्रामीण भागातील गावांमधून हा रुट मार्च काढण्यात आला.
सदरचा रूट मार्च हा जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख अप्पर पोलीस अधीक्षक आँचल दलाल-डुडी मॅडम उपविभागीय पोलीस अधिकारी सोनाली कदम यांच्या मार्गदर्शनाखाली साहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष कांबळे पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब लोंढे-पाटील यांच्यासह पोलीस ठाण्यातील विभागातील अधिकारी आणि पोलीस कर्मचाऱ्यांसह सीआरपी तुकडीतील जवानांनी या रूट मार्चमध्ये सहभाग नोंदवला होता.


0 Comments