LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

पुरीगोसावी यांच्या संपर्कांमुळे रणदुलाबाद मार्गावर तात्काळ बस धावली



संभाजी पुरीगोसावी (सातारा जिल्हा) प्रतिनिधी. उत्तर कोरेगांव तालुका विभागातील वाठार स्टेशन पिंपोडे सोनके करंजखोप रणदुलाबाद सोळशी नायगांव नांदवळ अशी गावे येतात. ही सर्व गावे कोरेगांव एसटी विभागांच्या अंतर्गत येतात. कोरेगांव आगारांचा कारभार देखील तसा चांगलाच चालू आहे. मात्र कोरेगांव आगारांचे कधीकाळी वेळापत्रक चांगलेच कोलमडते आणि याचा फटका प्रवाशांचं शालेय विद्यार्थी विद्यार्थिनींना चांगलाच बसत आहे. कोरेगांव आगारांकडूंन शनिवार रविवार अचानक ग्रामीण भागातील मुक्काम रद्द होत असतात. तर कधीकाळी बसला चालक आहे तर वाहक नाही डेपो मध्ये बस उपलब्ध नाही अशी उत्तरे प्रवाशांना मिळत असतात. शुक्रवारी शेंदुर्जन मुक्कामी असणारी आणि कोरेगांव येथून २ वाजता सुटणारी कोरेगांव- रणदुलाबाद रद्द झाली होती. यावेळी वाठार स्टेशन येथे सुमारे शालेय विद्यार्थी विद्यार्थिनी सह सुमारे २५ प्रवासी वर्ग एसटी बसची वाट पाहत होते. यावेळी वाठार विभागाचे एसटी कंट्रोल यांनी रणदुलाबाद ही बस रद्द असल्यांचे प्रवाशांना सांगितले होते. यावेळी पुरीगोसावी यांनी तात्काळ सातारा जिल्हा एसटी खात्यातील वरिष्ठांशी तात्काळ संपर्क साधून... सोनके करंजखोप या मार्गावर अचानक वाठार स्टेशन ते रणदुलाबाद  या मार्गावर तात्काळ बस सोडण्यात आली. यामुळे जवळपास २५ प्रवाशांसह शालेय विद्यार्थी विद्यार्थिनींना मिळाला दिलासा, कोरेगांव आगारांतून सुटणारी कोरेगांव रणदुलाबाद ही अचानक रद्द करण्यात आली. यावेळी वाठार स्टेशन येथे सुमारे 25 प्रवाशांस सह शालेय विद्यार्थी विद्यार्थिंनी बसची वाट पाहत होते. यावेळी पुरीगोसावी सातारा जिल्हा एसटी आगारांचे प्रमुख विभागीय नियंत्रक रोहन पलंगे साहेब विभागीय वाहतूक अधिकारी ज्योती गायकवाड मॅडम यांच्याशी तात्काळ संपर्क साधून... त्यांनी देखील  कोरेगांव आगारांतील अधिकाऱ्यांशी संपर्क साधून वाठार स्टेशन येथून बस उपलब्ध करून तात्काळ रणदुलाबाद या मार्गावर  सोडण्याबाबत सूचना केल्या. यावेळी पुरीगोसावी यांनी कोरेगांव आगारांतील अधिकाऱ्यांसह सातारा जिल्हा एसटी आगारांचे प्रमुख विभाग नियंत्रक मा. रोहन पलंगे साहेबांसह वरिष्ठांचे आभार मानले,

Post a Comment

0 Comments