शेत जमिनीच्या बांधावरून झालेल्या वादातून खून करून पळून जाणाऱ्या आरोपींच्या अखेर लोणंद पोलिसांनी एक तासांच्या आत आवळल्या मुसक्या.
संभाजी पुरीगोसावी (सातारा जिल्हा) प्रतिनिधी. लोणंद पोलीस ठाण्याच्या हद्दीमधील आदर्की खुद्द) गावच्या चिंचेचा मळा या शहरात दिनांक 2 मार्च रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारांस शेतातील बांधावरून बोरवेलची गाडी मशीन व पिकअप जीप घेवुन बांध खराब केल्याच्या रागांतून संशयित आरोपी सयाजी शंकर निंबाळकर (रा. आदर्की खुद्द ता.फलटण जि. सातारा ) याने चंद्रशेखर बबनराव निंबाळकर (वय ४८) रा. आदर्की खुद्द यांच्या डोक्यात कुऱ्हाडीचा घाव घालून खून केल्याची धक्कादायक घटना घडली होती. गुन्ह्याच्या नंतर लोणंद पोलिसांनी आणि ग्राम सुरक्षा यंत्रणा व ग्रामस्थांच्या मदतीने अवघ्या एक तासांच्या आत आरोपींच्या मुसक्या आवळण्यात यश मिळाले आहे. संशयित खून प्रकरणातील आरोपींला फलटण न्यायालयात हजर केले असता. सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनविण्यात आली आहे. या गुन्ह्याची फिर्याद मयत चंद्रशेखर निंबाळकर यांचा मुलगा चैतन्य निंबाळकर यांनी लोणंद पोलीस स्थानकात दिली होती पुढील तपास स.पो.नि. सुशील भोसले करीत आहेत. सदरची कामगिरी जिल्हा पोलीस प्रमुख समीर शेख अप्पर पोलीस अधीक्षक आँचल दलाल-डुडी मॅडम उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस लोणंद पोलीस ठाण्याचे प्रभारी सुशील भोसले पोलीस उपनिरीक्षक शिवाजी काटे पोलीस अंमलदार महेश सपकाळ नितीन भोसले नाना भिसे चंद्रकांत काकडे विठ्ठल काळे अभिजीत घनवट बापू मदने सतीश दडस सिद्धेश्वर वाघमोडे चालक संजय चव्हाण आदीं पोलिसांनी या कारवाईत सहभाग घेतला.


0 Comments