सोलापूर लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे. ही लोकसभा निवडणूक सोलापूरच्या मूलभूत प्रश्नावरती आणि मुद्द्यांवरती लढली जावी, यासाठी महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणित ताई शिंदे यांच्या वतीने '*'मुद्द्याचं बोला ओ* हे अभियान सुरू करण्यात येणार आहे.
या अभियानांतर्गत प्रणिती शिंदे या शेतकरी, महिला, युवक यांच्यासह सोलापुरातील विविध समाज घटकांशी मूलभूत मुद्द्यावर संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेणार आहेत. तसेच सत्ताधाऱ्यांना सोलापूरकरांच्या मुद्द्यावर बोलायला भाग पाडणार आहेत.
अभियानाच्या पहिल्या दिवशी म्हणजेच बुधवारी त्या सोलापूर शहरातील रिक्षा चालकांशी संवाद साधणार आहेत. सोलापूर शहरातील *होम मैदान येथे सायंकाळी 5:30 वाजता* त्या रिक्षा चालकांशी संवाद साधतील.
तरी आपण सर्व माध्यम प्रतिनिधींनी *'मुद्द्याचं बोला ओ* या अभियानाचे वार्तांकन करण्यासाठी उपस्थित राहावे ही विनंती


0 Comments