पुण्यात विमानाने प्रवास करून चोरी करणाऱ्या राजस्थानमधील टोळीच्या बंडगार्डन पोलिसांनी आवळल्या मुसक्या. सव्वाचार लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत,
संभाजी पुरीगोसावी (पुणे शहर) प्रतिनिधी. विविध शहरांत विमानाने प्रवास करून शहरांमध्ये मोठमोठ्या मॉलमध्ये महागडे ब्रँडेड कपडे आणि बूट चोरणाऱ्या टोळीच्या पुणे शहर पोलीस विभागातील बंडगार्डन पोलिसांनी अखेर मुसक्या आवळल्या आहेत. सदर टोळीच्या कब्जांतून सुमारे सव्वाचार लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून. याप्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये गौरवकुमार मीना (वय १९) बलरामकुमार मीना (वय २९) अशी ताब्यांत घेण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तर त्यांच्यासोबत या टोळीचा म्होरक्या योगेश मीना (वय २५) आणि सोनूकुमार मीना (वय २६) या चौघांनाही बंडगार्डन पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. अटक करण्यात आलेले चारही आरोपी हे मूळचे राजस्थानचे रहिवासी आहेत. सदरची कामगिरी प्रवीणकुमार पाटील अप्पर पोलीस आयुक्त श्रीमती स्मार्तना पाटील पोलीस उपायुक्त संजय सुर्वे सहाय्यक पोलीस उपायुक्त लष्करी विभाग वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदिपान पवार पोलीस निरीक्षक गुन्हे श्रीकांत निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि. अभिजीत जाधव पोलीस उपनिरीक्षक रवींद्र गावडे पोलीस अंमलदार ज्ञानेश्वर बडे शिवाजी सरक मनोज भोकर आदीं पोलिसांनी या कारवाईत सहभाग घेतला. बंडगार्डन पोलिसांच्या कामगिरीबद्दल पुणे शहर विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून बंडगार्डन पोलिसांचे विशेष कौतुक होत आहे.


0 Comments