संभाजी पुरीगोसावी (छत्रपती संभाजीनगर) प्रतिनिधी. छत्रपती संभाजीनगरचे नूतन पोलीस आयुक्त प्रवीणकुमार पवार यांची गृह मंत्रालयाने मंगळवारी (दि.25 जून) रोजी बदली केली आहे. प्रवीणकुमार पवार यांची छत्रपती संभाजीनगर येथे पोलीस आयुक्त पदी नियुक्ती करण्यात आली आहे, शासनाचे सह सचिव व्यंकटेश भट यांनी राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने आदेश काढले आहेत, कोकणपरिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक प्रवीण पवार यांची पुणे शहर पोलीस सह आयुक्तपदी बदली करण्यात आली होती, त्यानंतर आता छत्रपती संभाजीनगरचे पोलीस आयुक्त पदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे, गोरगरिबांना न्याय मिळवून देणारा अधिकारी म्हणून त्यांची पोलीस खात्यात ओळख आहे, छत्रपती संभाजीनगरचे पोलीस आयुक्त मनोजकुमार लोहिया यांच्या सेवानिवृत्तीनंतर तात्काळ संदीप जी. पाटील यांच्याकडे तात्पुरत्या स्वरूपात कार्यभार सोपविण्यात आला होता, नवनियुक्त आयुक्त प्रवीणकुमार पवार बुधवारी सकाळी आपल्या पदाचा पदभार स्वीकारणार आहेत,


0 Comments