LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

सातारा ते पुणे आता प्रवास होणार शांतमय अन् थंडगार, सातारा ते स्वारगेट मार्गावर धावणार 5 इलेक्ट्रिक बस, प्रवाशांच्या सेवेसाठी दाखल,

सातारा ते पुणे आता प्रवास होणार शांतमय अन् थंडगार, सातारा ते स्वारगेट मार्गावर धावणार 5 इलेक्ट्रिक बस, प्रवाशांच्या सेवेसाठी दाखल, संभाजी पुरीगोसावी ( सातारा जिल्हा ) प्रतिनिधी. प्रवाशांच्या सेवेसाठी हे ब्रीदवाक्य असलेल्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या सातारा विभागात रक्षाबंधन सणाच्या मुहूर्तावर ५ वातानुकूलित ही बसेस दाखल झाल्या आहेत, या बसेस येत्या आठवड्याभरात सातारा ते स्वारगेट मार्गावर धावणार आहेत, सातारा विभागातील सातारा कराड पाटण वाई महाबळेश्वर मेढा पारगांव खंडाळा फलटण वडूज दहिवडी कोरेगांव या 11 आगारांत सध्याच्या घडीला 686 बसेस कार्यरत आहेत. शासनाने विविध सवलती जाहीर केल्याने एसटीकडे प्रवाशांची चांगलीच ओढ वाढल्याने एसटी फायद्यात येऊ लागली आहे, राज्य शासनानेही एसटी महामंडळ फायद्यात येण्यासाठी ई- बस सेवा सुरू करणार असल्याची घोषणा केली होती, प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी व महामंडळाच्या खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी ई.बस सेवा सुरू केली आहे, त्यानुसार रक्षाबंधन सणाच्या मुहूर्तावर सातारा एसटी आगारांत ५ ई बससे सोमवारी दाखल झाल्या असून याप्रसंगी या नव्या बसचे लोकार्पण करताना पालकमंत्री शंभूराज देसाई सातारा आगारांचे प्रमुख विभागीय नियंत्रक रोहन पलंगे विभागीय वाहतूक अधिकारी ज्योती गायकवाड रेश्मा गाडेकर विभागीय वाहतूक अधीक्षक गायकवाड सातारा आगार व्यवस्थापक रत्नकांत शिंदे तेजस नवले यांच्यासह आदीं अधिकारी वर्ग तसेच चालक वाहकांची यावेळी मोठ्या संख्येने उपस्थिती होती,

Post a Comment

0 Comments