LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

अकलूज शासकीय विश्रागृहावर माळशिरस तालुक्यातील नाभिक समाज बांधवांची प्राथमिक बैठक संपन्न झाली.

दि.26- अकलूज शासकीय विश्रागृहावर माळशिरस तालुक्यातील नाभिक समाज बांधवांची प्राथमिक बैठक संपन्न झाली.
        👉2005 साली दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी प्रतापगड येथील वीर जिवाजी महाले स्मारकासाठी अर्थसंकल्पात निधी घोषित केला,निधी मिळाला नाही.
👉 2012 साली उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सिद्धगड येथील हुतात्मा भाई कोतवाल यांच्या स्मारकासाठी अर्थसंकल्पात निधी घोषित,केला निधी मिळाला नाही.
👉2018 साली शासनाने नाभिक समाजासाठी 'केशकला बोर्ड' घोषित करून जानेवारी 2024 मध्ये 'संत सेनाजी महाराज केशशिल्पी महामंडळ उपकंपनी'ची स्थापना केली आहे.अर्थसंकल्पात निधी घोषित,केला निधी मिळाला नाही. 
       शासनाने नाभिक समाजाची फसवणूक केली काय ? अशी भावना महाराष्ट्रातील नाभिक समाजाची होत आहे. देश स्वातंत्र्य झाल्यापासून नाभिक समाजासाठी स्वतंत्र एक रुपयांचा बजेट या सरकारने केलेले नाही. त्यामुळे 
1)आमच्या हक्काचा निधी आहे तो इतरत्र न वळवता आम्हाला द्यावा.
2)महामंडळ कार्यान्वित करण्यासाठी लवकरच प्रशासनाकडून मंत्रालयीन पातळीवर बैठक आयोजित करावी.
         या मागणीसाठी आगामी काळात उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री मा.अजित पवार व पर्यायी शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी 'पंढरपूर ते बारामती .......यात्रा' काढण्याचा मानस आहे.सदर बैठकीत विविध विषयांवर सकारात्मक चर्चा झाली आहे.
          यावेळी किरण भांगे यांनी आयोजित केलेल्या बैठकीस सोलापूर जिल्हा सरचिटणीस आणि शंकरनगर ग्रा.पं.सदस्य उद्योजक सचिन(अण्णा)डांगे,चाकोरे मा.सरपंच नवनाथ जाधव,शेंडेचिंच मा.सरपंच प्रदीप जाधव,अजिनाथ वाघमारे, धनेश डांगे, सोमनाथ तात्या सपताळ, नानासाहेब साळुंखे,अक्षय'जी शिंदे,प्रज्वल काळे,रामेश्वर गवळी,विठ्ठल आप्पा जाधव, शंकरराव जाधव,ऋषिकेश गाडे इ.उपस्थित होते.
किरण सविता तुकाराम भांगे इत्यादी राज्यातून अनेक कार्यकर्ते उपस्थित होते

Post a Comment

0 Comments