पंढरपूर, येथील हिंदवी स्वराज्य भूषण शिवबा काशीद जन्मोत्सव सोहळा दि ५, रोजी होणार आहे.सोमवार सकाळी ९, वाजता छत्रपती शिवाजीराजे महाराज पुतळ्याचे पूजन बाळासाहेब देवकर यांच्या शुभहस्ते करण्यात येणार आहे. तर हिंदवी स्वराज्य भूषण शिवबा काशीद उत्सव मुर्ति चे पुजन आमदार समाधान आवताडे, माजी आमदार प्रशांत परिचारक, माजी नगराध्यक्ष नागेश भोसले, यांच्या शुभहस्ते करण्यात येणार आहे.सकाळी ११, वाजता प्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे हे वाटप डि,वाय ,एस, पी, अजुॅन भोसले, शहर पोलिस निरीक्षक विश्वजीत घोडके, प्रशांत जाधव मुख्याधिकारी, राजाभाऊ आराध्ये, यांच्या शुभहस्ते करण्यात येणार आहे.हिदवी स्वराज्य भूषण शिवबा काशीद चौक नामफलक व रॅली पुजन संपादक प्रमोद भोसले, पत्रकार प्रशांत वाघमारे सर, जितेंद्र भोसले, सतिश चव्हाण, महेश माने, साईनाथ शिंदे, यांच्या शुभहस्ते होणार आहे. हिंदवी स्वराज्य भूषण शिवबा काशीद उत्सव मुर्ति चे पुजन आमदार अभिजित पाटील, आमदार राजू खरे, माजी चेअरमन भगिरथ भालके, भैरवनाथ शुगर चे अनिल सावंत, मनसे नेते दिलीप धोत्रे, शिवसेनेचे चे संभाजी शिंदे, क्राग्रेस चे सुनंजय पवार, तुकाराम चव्हाण, युवराज हडपद, निलेश शिंदे, यांच्या शुभहस्ते होणार आहे.तरी शहरातील नाभिक बांधवांनो मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहावे असे आवाहन अध्यक्ष महादेव शिंदे यांनी केले आहे.
0 Comments