LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

स्वेरीच्या विद्यार्थ्यांचे ‘डिपेक्स २०२५’ मध्ये यश



पंढरपूर- गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (ऑटोनॉमस) च्या इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग आणि कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग या दोन विभागांमधील गणेश नवनाथ सुरवसे, मोहिनी हणमंत खटकाळे, राजनंदिनी भाऊराव इंगळे, कृष्णा दिनेश मोरे आणि तेजस रवींद्र वायदंडे यांना कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (सीओईपी) टेक्नॉलॉजिकल यूनिवर्सिटी, पुणे येथे घेतलेल्या ‘डिपेक्स २०२५’ या राज्यस्तरीय प्रोजेक्ट कॉम्पिटिशनमध्ये  मोबीलीटी या प्रवर्गात ‘टेस्ट बेंच फॉर मल्टी रोटर ड्रोन’ या प्रकल्पासाठी प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळाला आहे.
           महाराष्ट्र आणि गोवा या राज्यांतील विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेले हे एक महत्त्वाचे राज्यस्तरीय प्रदर्शन होते. या उपक्रमाचे आयोजन दरवर्षी विविध शैक्षणिक संस्थांमध्ये केले जाते. त्यामध्ये नवीन प्रकल्पांचे सादरीकरण केले जाते. गेल्या महिन्यात झालेले राज्यस्तरीय प्रदर्शन हे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे,अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, सृजनन्यास, सावित्रीबाई फुले, पुणे विद्यापीठ पुणे आणि महाराष्ट्र राज्य तांत्रिक शिक्षण मंडळ (एमएसबीटीई) यांनी आयोजित केले होते. या राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये दोन हजारांहून अधिक प्रकल्पांची नोंदणी झाली होती. या उपक्रमांतर्गत ३५० हून अधिक मॉडेल्सचे प्रदर्शन करण्यात आले तर सुमारे ५ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी या परिषदेमध्ये सहभाग घेतला होता. ‘डिपेक्स २०२५’ या राष्ट्रीय परिषदेमध्ये एकूण ११ प्रकारांमध्ये प्रकल्प सादर करण्यात आले होते. डिपेक्स या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी आपल्यातील नाविन्यतेची, संशोधनाची आणि तांत्रिक कौशल्यांची क्षमता वाढवण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिल्याचे दिसून येते. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या प्रकल्पांचे सादरीकरण करण्यासाठी एक व्यासपीठ मिळते. ज्यामुळे त्यांच्या करिअरच्या विकासास मदत होते. या प्रकल्पासाठी विद्यार्थ्यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूरच्या विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. प्रशांत पवार यांच्या मार्गदर्शनाखाली चालू असलेल्या आर. जी. एस. टी. सी. ड्रोन प्रकल्प व ड्रोन टिम, तसेच शैक्षणिक अधिष्ठाता डॉ.एम. पी. ठाकरे व प्रा.एस. एस. कवडे यांचे मार्गदर्शन लाभले. संस्थेचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे, संस्थेचे अध्यक्ष दादासाहेब रोंगे, उपाध्यक्ष हनीफ शेख, संस्थेचे विश्वस्त व पदाधिकारी, स्वेरी अंतर्गत असलेल्या चारही महाविद्यालयांचे प्राचार्य, कॅम्पस इनचार्ज डॉ. एम. एम. पवार, डिग्री इंजिनिअरिंगच्या उपप्राचार्या डॉ. मिनाक्षी पवार, इलेक्ट्रिकल व कॉम्प्यूटर सायन्स अँड इंजिनिअरिंगचे विभागप्रमुख, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

Post a Comment

0 Comments