LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

स्वेरीमध्ये ‘इंट्रोडक्शन टू अॅन्सीस’ ही कार्यशाळा उत्साहात संपन्न





पंढरपूर– गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग च्या मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभाग व  संशोधन व विकास (रिसर्च अँड डेव्हलपमेंट) सेल यांच्या संयुक्त विद्यमाने ‘इंट्रोडक्शन टू अॅन्सीस’ या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. ही कार्यशाळा अॅन्सीस व ए.आर.के. सोल्युशन्स, पुणे  यांच्या तांत्रिक सहकार्याने पार पडली.
     या एकदिवसीय कार्यशाळेत द्वितीय वर्ष मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या १२० हून अधिक विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. अॅन्सीस सॉफ्टवेअरच्या वापराविषयी मूलभूत ज्ञान, सैद्धांतिक संकल्पना, तसेच सिम्युलेशन तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक मार्गदर्शन देणे हा या कार्यशाळेचा मुख्य उद्देश होता. औद्योगिक क्षेत्रात अत्यंत महत्त्वाचे असलेले फाईनाईट एलेमेंट अनालिसिस (एफइए) व कॉम्प्युटर एडेड इंजिनिअरिंग (सीएई) या तंत्रज्ञानांच्या सहाय्याने डिझाईन प्रक्रियेतील अचूकतेची महत्ता व गरज याचे स्पष्टीकरण प्रशिक्षकांनी उदाहरणांसहित दिले. कार्यशाळेसाठी पुण्यातील ए.आर.के. सोल्युशन्स कंपनीचे तज्ज्ञ मंजुनाथ, चेतन पाटील, अनुप सिंग आणि  गजानन जिल्हेवार हे आले होते. त्यांनी अत्यंत समर्पक व संवादात्मक सत्रांद्वारे विद्यार्थ्यांना अॅन्सीस सॉफ्टवेअरच्या विविध ऍप्लिकेशन्स संदर्भात सखोल मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी विविध इंडस्ट्री-ओरिएंटेड केस स्टडीज आणि सिम्युलेशन मॉडेलिंगचा अनुभव घेतला. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात आयोजिलेल्या प्रश्नमंजुषा स्पर्धेत विद्यार्थ्यांचा भरघोस सहभाग लाभला. गुणवत्तेच्या आधारे निवडण्यात आलेल्या विजेत्यांना पारितोषिके प्रदान करण्यात आली. यामध्ये प्रथम क्रमांक अश्विनी दत्तू भोंग यांना रु.५ हजार, द्वितीय क्रमांक सुरज महादेव घोडके यांना रु.३ हजार तर तृतीय क्रमांक प्राजक्ता प्रदीप कोथावले यांना रु. २ हजार रोख रक्कम व प्रमाणपत्र देवून त्यांना सन्मानित करण्यात आले. विजेते विद्यार्थी हे मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या दुसऱ्या वर्गात शिक्षण घेणारे आहेत. समारोपप्रसंगी स्वेरीचे सचिव प्रा. सुरज रोंगे व विद्यापीठ विकास मंचचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रोहित राऊत हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना उद्योगाभिमुख कौशल्ये आत्मसात करण्यासाठी अशा प्रशिक्षण कार्यशाळांचे महत्त्व अधोरेखित केले. ही कार्यशाळा आयोजित करण्यासाठी स्वेरीचे संस्थापक व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. बी. पी. रोंगे यांचे प्रेरणादायी मार्गदर्शन लाभले. त्यांच्या दूरदृष्टीमुळेच अशा उच्चस्तरीय उपक्रमांची साखळी या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचते आहे. स्वेरी ही शिक्षण संस्था ग्रामीण भागातील गुणवत्तापूर्ण, संशोधनप्रधान व उद्योगाभिमुख शिक्षणासाठी राज्यभरात ओळखली जाते. संस्थेच्या ५००० हून अधिक विद्यार्थी संख्या, नॅक ए प्लस (३.४६ सी.जी.पी.ए.) मानांकन, एन.बी.ए. मान्यता प्राप्त अभ्यासक्रम आणि अलीकडे प्राप्त झालेला युजीसी व पु. अ. हो. सोलापूर विद्यापीठाकडून मिळालेला स्वायत्त (ऑटोनॉमस) दर्जा हे संस्थेच्या शैक्षणिक गुणवत्ता व प्रशासनिक दृढतेचे उत्तम उदाहरण आहे. ही कार्यशाळा विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरली असून, त्यांनी सैद्धांतिक व प्रात्यक्षिक ज्ञानातून औद्योगिक क्षेत्रातील तांत्रिक क्षमता विकसित केल्या. ही कार्यशाळा स्वेरीच्या उद्योगाभिमुख शिक्षण व संशोधनवाढीच्या धोरणाची साक्ष ठरली आहे. मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे विभागप्रमुख डॉ. एस. बी. भोसले, आर. अँड डी. अधिष्ठाता डॉ. अमरजीत केने, समन्वयक प्रा. सी. सी. जाधव आणि प्रा. एस. एन. मोरे यांनी कार्यशाळेच्या आयोजनात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. स्वेरीचे संस्थापक व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. बी. पी. रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वेरीचे कॅम्पस इन्चार्ज डॉ. एम. एम. पवार यांच्या सहकार्याने, व उपप्राचार्या डॉ. मिनाक्षी पवार यांच्या नेतृत्वाखाली सदरची कार्यशाळा यशस्वी ठरली.

Post a Comment

0 Comments