पंढरपूर शहरातील नागरिकांना कळविण्यात येते की, जिल्हाधिकारी, सोलापूर यांनी कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय येथे दिनांक 1 व 2 मे 2025 रोजी पंढरपूर शहरांमध्ये राबविण्यात येणाऱ्या विकास आराखड्या बाबत बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीत सन १९८२ मध्ये श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसरामध्ये नगररचना योजना राबविण्यात आली होती. परंतु विस्थापित नगर येथे बाधित मालमत्ता धारक यांना प्लॉट मिळाले नाहीत. प्लॉटच्या खरेदी ही दिल्या नाहीत. अथवा आर्थिक मोबदला मिळाला नाही अशा अनेक तक्रारी बाधित नागरिकांनी केल्या होत्या. यास अनुसरून जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी उपविभागीय अधिकारी,तथा प्रांताधिकारी श्री सचिन इथापे यांची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती केलेली आहे. नगररचना योजनेमध्ये ज्या बाधित मालमत्ता धारक यांना लाभ मिळाला नाही अशा मालमत्ता धारक यांनी आवश्यक त्या कागदपत्रासह अर्ज करणेस मुदत देण्यात आली होती. तथापि अजूनही कोणी विस्थापित नागरिक अर्ज करावयाचे राहिले असतील तर त्यांना पुन्हा अर्ज सादर करणेसाठी संधी देऊन मुदत वाढ करण्यात आलेली आहे. संबंधित नागरिकांनी दि. २६ जुलै २०२५ पर्यंत मुख्याधिकारी पंढरपूर नगरपरिषद यांच्याकडे अर्ज सादर करावेत. तसेच यापूर्वी अर्ज सादर केलेल्या विस्थापितांना अपुऱ्या कागदपत्राबाबत त्रुटीपत्र देण्यात आलेले आहे. त्यांनी त्रुटी पत्रानुसार आवश्यक कागदपत्रे मुख्याधिकारी नगरपरिषद पंढरपूर यांच्याकडे सादर करावेत असे आवाहन उपविभागीय अधिकारी तथा प्रांताधिकारी श्री सचिन इथापे यांनी केले आहे. जेणेकरून आलेल्या अर्जावर योग्य ती कार्यवाही करता येईल.
0 Comments