LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

संडे स्पेशल प्रशांत वाघमारे *जेव्हा नव्हते चराचर, तेव्हा होते पंढरपूर* (पंढरीचे महात्म) संत नामदेव महाराज म्हणतात,आधी रचिली पंढरी, मग वैकुंठ नगरी, जेव्हा नव्हते चराचर, तेव्हा होते पंढरपूर! जेव्हा नव्हती गोदा गंगा, तेव्हा होती चंद्रभागा !


    पंढरपूर युगात अखंड, चिरंतर मानले जाते. म्हणूनच युगानुयुगे वारकरी पंढरीकडे एका अनामिक ओढीने धाव घेत असतात.पंढरपूर ही फक्त भौगोलिक जागा नाही तर ते अनादी, शाश्वत आणि दिव्य तत्त्व आहे. विठोबा ही फक्त मूर्ती नाही, तर ते अनादी भक्तीचे मूर्त स्वरूप आहे. विठ्ठल मंदिर हे लाखो वारकऱ्यांचे हृदयातील अढळ स्थान आहे. त्यामुळे त्याच्या कळसाचे दर्शन घेतले तरी वारकरी धन्य धन्य होतो. 
     *स्थापत्य शास्त्रानुसार श्री विठ्ठल रुक्मिणी  मंदिर हे सोळा-सतरा व अठराव्या शतकातील मानले जाते. परंतु आठव्या शतकात शंकराचार्यांच्या  पांडुरंग स्त्रोत्रामध्ये पांडुरंगाचा संदर्भ आढळतो. त्यामुळे विठ्ठल मंदिराच्या कोणत्या युगातील आहे याविषयी  नक्की अंदाज लावणे कठीण आहे.  होयसळ साम्राज्याचा राजा विष्णुवर्धनाने 1108 ते 1152 दरम्यान मंदिर बांधल्याचाही उल्लेख आढळतो.1237 साली राजा वीर सोमेश्वर यांचा शिलालेख याविषयी माहिती देतो. पूर्वी बांधलेल्या मंदिराचा 84 वर्षांनी  जीर्णोद्धार झाल्याने माणसाला  84 लक्ष योनीतून मुक्ती मिळत असल्याचे मानले जाते*.
     *श्री विठ्ठल रुक्मिणी चे मंदिर हे पूर्वा मुखी असून, पूर्वेच्या दरवाजास महाद्वार संबोधले जाते. मंदिरास एकूण आठ द्वारे आहेत. पूर्ण मंदिर हेमाडपंथी स्थापत्य शैलीचा उत्कृष्ट नमुना आहे. केवळ दगडाच्या अचूक जुळणीवर या मंदिराचे बांधकाम केल्याच्या आढळते. गाभारा, अंतराळ, सभा मंडप  असे मंदिराचे मुख्य भाग आहेत. त्यापुढे सुंदर असा लाकडी मंडप आहे. मंदिराचा मुख्य गाभारा सहा चौरस फुटांचा असून त्यामध्ये तीन फुटांचा मूर्तीचा कट्टा आहे. विठ्ठलाची मूर्तीची  ही शाळीग्राम दगडाची असल्याचे जाणवते. त्यापुढे असणारा अंतराळामध्ये दगडी चार खांब आहेत. सुरुवातीस असणारा सभामंडप हा सोळा खांबी असून त्यामध्ये असणाऱ्या गरुड स्तंभास येणारा प्रत्येक माणूस भेटून दर्शन घेतो. सध्या मंदिरास पूर्वीचे अनोखे सुंदर रूप दिल्याने सभा मंडपातील रेखीव दगडी काम वैष्णवांच्या डोळ्याचे पारणे फेडते. त्यापुढील लाकडी सभामंडप हा पेशवेकालीन असल्याचे सांगितले जाते. मंदिराच्या सुरुवातीला नामदेव पायरी असून त्या ठिकाणी संत नामदेवांच्या अनेक वंशजनानी जिवंत समाधी घेतल्याचे सांगितले जाते. विजय नगरच्या कृष्णदेवरायणे विठ्ठलाची मूर्ती आपल्या राज्यात नेली होती. ती संत एकनाथांचे पणजोबा भानुदास महाराज यांनी परत आणण्याचा उल्लेख जाणवतो. त्यामुळे मंदिरात त्यांची समाधी ही आढळून येते. नामदेव पायरी शेजारीच संत कान्होपात्रा यांची समाधी आहे*.  
     मुख्य गाभाऱ्याच्या उत्तर पूर्वेला रुक्मिणी मातेचे मंदिर आहे. त्यामध्ये असणारी रुक्मिणी मातीची मूर्ती फारच सुंदर आहे. गाभारा सभामंडप व हॉल अशी त्याची रचना आढळून येते. त्याचा शेजारीच सत्यभामा, सागर कुंवरी लक्ष्मीचे छोटे मंदिर आहे.
      *वारीची परंपरा ही नक्की कधीपासून सुरू आहे हे सांगता येणार नाही. तेरावे शतक ही संतांची मांदियाळी समजली जाते. वारकरी संप्रदाय हा त्यावेळी प्रतिष्ठित आणि प्रस्थापित होता. 1685 साली जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचे तिसरे चिरंजीव नारायण महाराज यांनी पालखी सोहळ्यास सुरुवात केली. ते संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली व जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या एकत्रित पादुका पंढरपुरास घेऊन येत होते. हा पालखी सोहळा पुढे 147 वर्ष अखंडितपणे चालू राहिला. त्यानंतर 1832 साली संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली व जगद्गुरु तुकाराम महाराज यांचे पालखी सोहळे वेगवेगळे झाले. तेव्हापासून अखंडपणे हे पालखी सोहळे पंढरीस लाखो  वारकऱ्यांच्या सोबतीने पाई चालत येत असतात. कोरोना कालावधीमध्ये तेवढे हे पालखी सोहळे वाहनातून आणले गेले होते*.
     पंढरीची वारी हे भाव भक्तीचे चलनवलन आहे. त्यातून सामाजिक एकात्मता साधली जाते. इथे जात, धर्म, लिंग अथवा कोणताही भेदभाव न पाळता, सर्वजण एकमेकाला माऊली संबोधन एकमेकांच्या पाया पडतात. खऱ्या अर्थाने हे लोकशाहीचे प्रतिक आहे. पंढरपूरच्या या वारीमध्ये सेवा, समर्पण, भक्ती व शिस्तीची ठाई ठाई प्रचिती येते. वारी कालावधी मधील दिंडी व्यवस्थापन अनुभवण्यासारखे असते. वारकरी व वारी मार्गावरील लोक हे दुसऱ्याच्या सेवेत देव मानत असतात. पंढरीचीवारी ही जगण्याची कृतीशील प्रक्रिया आहे. पंढरीची वारी हा चालता धर्म, चालती संस्कृती, चालती भक्ती, प्रेम, समर्पण, सेवाभाव व पांडुरंगाप्रति असणारी निष्ठा दर्शवते.
 *यावर्षीच्या पंढरीच्या आषाढी वारीमध्ये महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली वारकऱ्यांसाठी उपलब्ध करून दिलेल्या सेवा सुविधामुळे वारकरी फार समाधानी आहेत. यासाठी प्रत्येक वारकरी देवा भाऊंचे आभार मानतात. पालकमंत्री जयकुमार गोरे, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, जिल्हा पोलीस प्रमुख अतुल कुलकर्णी, मंदिर समितीचे मुख्याधिकारी राजेंद्र शेळके व त्याचे सोबतच्या सर्वच प्रशासकीय अधिकाऱ्यांनी प्रत्यक्षपणे जागेवरती जाऊन वारकऱ्यांना सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्याने यावेळची वारी ही अत्यंत आध्यात्मिक वातावरणात पार पडत असल्याने वारकऱ्यांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.*🦚 श्री प्रशांत वाघमारे पंढरपूर 9860786735 कृपया प्रतिक्रिया कळवा व पुढे पाठवा.
*Mi माझ्याशी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व पुढे पाठवा* 
.

Post a Comment

0 Comments