LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मध्ये‘अ‍ॅडव्हान्स्ड इंडस्ट्रियल अ‍ॅटोमेशन कंट्रोल’ ही कार्यशाळा संपन्न

 

पंढरपूर- गोपाळपूर (ता. पंढरपूर) मधील स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभागामार्फत ‘अ‍ॅडव्हान्स्ड इंडस्ट्रियल ऑटोमेशन कंट्रोल’ या विषयावर दि.२२ जुलै २०२५ ते  दि.०२ ऑगस्ट २०२५ अशा तब्बल दोन आठवड्यांची कार्यशाळा पार पडली. या कार्यशाळेला विद्यार्थ्यांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. 
           कार्यशाळेच्या पहिल्या दिवशी इंडस्ट्रियल ऑटोमेशन इंडस्ट्रीची रचना, फील्ड डिव्हाइसेसची माहिती, कंट्रोलर्सची ओळख तसेच पीएलसी विरुद्ध मायक्रोकंट्रोलर यांची सविस्तर माहिती देण्यात आली. या कार्यशाळेसाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून मंगरूळ (कर्नाटक) मधील इंडवेल ऑटोमेशन कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक हिमांशू कुमार हे लाभले होते. या कार्यशाळेत पीएलसी ब्लॉक डायग्राम, लॅडेर डायग्राम प्रोग्रॅमिंग, कोडेसिस सॉफ्टवेअरचा वापर, लॅच-इंटरलॉक-फ्लॅग प्रोग्रॅम्स, टायमर व काउंटर बेस्ड प्रोग्रॅम्स, पीएलसी आणि जीएक्स सॉफ्टवेअर यांची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. याशिवाय पीएलसी वायरिंग, प्रोजेक्ट डेव्हलपमेंट, एचएमआय व स्काडा स्क्रीन मित्सुबिशी डेव्हलपमेंट, व्हीएफडी, एसी ड्राईव्हचे पॅरामीटर्स, एसीडी-डीएसी चे अनुप्रयोग तसेच रिअल-टाईम अप्लिकेशन्स यावर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष सराव, सिम्युलेशन व प्रोजेक्ट डेव्हलपमेंट करून तांत्रिक कौशल्य आत्मसात केले. कार्यशाळेचा समारोप क्विझ टेस्ट व प्रमाणपत्र वितरणासह उत्साहात पार पडला. या कार्यशाळेमुळे विद्यार्थ्यांना इंडस्ट्रियल ऑटोमेशन क्षेत्रातील सखोल ज्ञान मिळाले तसेच प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांमुळे औद्योगिक कौशल्य विकसित झाले. विद्यार्थ्यांना शिक्षण घेताना सदरच्या कार्यशाळेचा फायदा  होणार आहे. ही कार्यशाळा स्वेरीचे संस्थापक व प्राचार्य डॉ. बी. पी. रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली, कॅम्पस इन्चार्ज डॉ.एम.एम.पवार यांच्या सहकार्याने, उपप्राचार्या डॉ. मिनाक्षी पवार यांच्या नेतृत्वाखाली संपन्न झाली. या कार्यशाळेत अंतिम वर्षातील १४० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या कार्यशाळेचे समन्वयक म्हणून प्रा. शशिकांत कांबळे यांनी काम पाहिले. सूत्रसंचालन डॉ. एन.पी. कुलकर्णी यांनी केले तर कार्यशाळेचे आभार विभागप्रमुख डॉ. सुमंत आनंद यांनी मानले.

Post a Comment

0 Comments