LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

शहर गुन्हे शाखेने चोरीच्या 03 गुन्ह्यातील 01 ऑटो रिक्षा, 01 मोटार सायकल व 23 मोबाईल हँडसेट जप्त केले.



पंढरपूर(प्रतिनिधी):-
सोलापूर शहरामधील मालमत्तेविषयक चोरीचे गुन्हे उघडकीस आणणे बाबत मा. श्री. एम. राज कुमार, पोलीस आयुक्त, डॉ. अश्विनी पाटील पोलीस उप-आयुक्त (गुन्हे/विशा), श्री. राजन माने सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे) यांनी गुन्हे शाखेकडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना मार्गदर्शन करुन सुचना दिल्या होत्या.

त्यानुसार पोउपनि मुकेश गायकवाड यांनी प्राप्त गोपनिय बातमी बाबत श्री. अरविंद माने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा यांना सविस्तर माहिती देवून, त्यांचे सूचनेनुसार खालीलप्रमाणे कारवाई करण्यात आली आहे.

अ) दि. 23/09/2025 रोजी पोउपनि. मुकेश गायकवाड व त्यांचे तपास पथक पोलीस आयुक्तालयात गस्त करीत असताना, "एक इसम चोरीची ऑटो रिक्षा विक्री करण्यासाठी महालक्ष्मी मंदिर ते मार्केट यार्डच्या पाठीमागील जाणारा सार्वजनिक रस्त्याचे कडेला थांबला असल्याची गोपनिय माहिती प्राप्त झाली." त्या बातमीप्रमाणे इसम नामे सैफन नुरुदीन वागवान वय 30 वर्षे, व्यवसाय मजुरी, राहणार- 410 किसान नगर, अंबाबाई मंदिरा जवळ चौगुले यांचे घरात भाडयाने, सोलापूर यास ताब्यात घेऊन त्याच्याकडुन 1) एक काळ्या रंगाची BAJAJ AUTO कंपनीची ऑटो रिक्षा, त्याचा आर.टि.ओ. क्र. MH13 CT 5736 2) 15,000/- रुपये एक काळया रंगाची यूनिकॉर्न कंपनीची नंबर प्लेट नसलेली मोटार सायकल असे 01 ऑटो रिक्षा व 01 मोटार सायकल ताब्यात घेऊन 1) जेलरोड पोलीस ठाणे गु. र. क्र. 487/2025 भा. न्या. सं. क. 303(2), 2) वळसंग पोलीस ठाणे, सोलापूर ग्रामीण गु. र. क्र. 378/2025 भा.न्या.सं. क. 303 (2) अन्वये दाखल असलेले 02 गुन्हे उघडकीस आणले आहेत.

ब) दि. 28/09/2025 रोजी पोउपनि, मुकेश गायकवाड व त्यांचे तपास पथक पोलीस आयुक्तालयात गस्त करीत असताना, एक संशयीत इसम नामे लखन तुकाराम बेरुणगी वय 38 वर्षे, राहणार- 10377/27 राहुल गांधी झोपडपट्टी, दाजी पेठ, सोलापूर हा त्याच्या हातामध्ये पांढऱ्या रंगाच्या पिशवीमध्ये काहीतरी घेऊन जात असताना मिळुन आला. त्यावेळी त्यास ताब्यात घेऊन पिशवीची झडती घेतली असता, त्यामध्ये विविध कंपनीचे 23 स्मार्ट मोबाईल फोन मिळुन आले. नमुद मोबाईलच्या IMEI नंबरची पडताळणी केली असता, त्यामध्ये एक सॅमसंग कंपनीचा मोबाईल हा जोडभावी पेठ पोलीस ठाणे गु.र.नं. 656/2025 भा. न्या. सं. क. 303 (2) या गुन्हयातील असल्याचे दिसुन आले. त्याचप्रमाणे उर्वरीत 22 मोबाईल हँडसेट यांचे IMEI नंबरची पडताळणी करुन मोबाईल धारकांचा शोध सुरु आहे.

अशाप्रकारे शहर गुन्हे शाखेकडून चोरीच्या गुन्ह्यातील 01 ऑटो रिक्षा, 01 मोटार सायकल व 23 मोबाईल हैंडसेट जप्त करुन 03 गुन्हे उघडकीस आणूण एकुण 03,05,000/- रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

सदरची कामगिरी मा. श्री. एम. राज कुमार, पोलीस आयुक्त सोलापूर शहर, डॉ. अश्विनी पाटील, पोलीस उप-आयुक्त (गुन्हे/विशा), श्री. राजन माने सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे), यांचे मार्गदर्शनाखाली श्री. अरविंद माने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा, पोउपनि. मुकेश गायकवाड व त्याचे तपास पथकातील पोलीस अंमलदार नंदराम गायकवाड, वाजीद पटेल, योगेश बर्डे, संजय साळुंखे, अजिंक्य माने, प्रकाश गायकवाड, मच्छिंद्र राठोड, चालक बाळु काळे, सतिश काटे यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments