LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

*छोट्याशा हातातून मोठं औदार्य! स्वराजने स्वतःची पिगी बँक पूरग्रस्तांसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली सुपूर्द*


सोलापूर - सीना नदीला आलेल्या महापुरामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर बुधवारी सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात तिऱ्हे गावातील लहानग्या स्वराज गोपाळ सुरवसे या शेतकरीपुत्राने आपली पिगी बँक जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडे जमा केली. वाढदिवसाला सायकल घेण्यासाठी साठवलेले पैसे त्याने पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदत म्हणून दिली.

जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी स्वराजच्या या दानत वृत्तीचे मनापासून कौतुक केले. त्यावेळी उपस्थित असलेल्या ग्रामस्थांनीही या लहानग्या मुलाच्या निर्णयाचे स्वागत केले.

महापुरामुळे अनेक शेतकऱ्यांची घरे, जनावरांचे गोठे आणि शेती पाण्याखाली गेली. जनावरांच्या चाऱ्याची टंचाई निर्माण झाली. या संकटातच स्वराजचे वडील गोपाळ सुरवसे यांनी आपल्या शेतातील एक एकर मका जनावरांच्या चाऱ्यासाठी उपलब्ध करून दिला. त्याच औदार्याची परंपरा स्वराजने पुढे चालवत स्वतःची पिगी बँक पूरग्रस्तांच्या मदतीसाठी दिली.

या छोट्याशा पण हृदयाला भिडणाऱ्या कृतीचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. भाजप तालुका अध्यक्ष रामकाका जाधव यांनी स्वराजच्या संवेदनशीलतेचे कौतुक करताना, इतक्या लहान वयात समाजासाठी काही करण्याची त्याची वृत्ती सर्वांसाठी प्रेरणादायी असल्याचे मत व्यक्त केले आणि स्वराजच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

0 Comments