मराठवाड्यातील लातूर जिल्ह्यातील अतिवृष्टी आणि महापुरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने खते आणि बी बियाण्याचे वाटप मनसे नेते माजी गृहराज्यमंत्री बाळा नांदगावकर, पाणी दूत प्रदेश सरचिटणीस डॉक्टर मनोज चव्हाण, मनसेने ते दिलीप बापू धोत्रे, शेतकरी सेनेचे प्रदेशाध्यक्ष संतोष नागरगोजे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी बोलताना मनसे नेते बाळ आनंदगावकर म्हणाले की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टी आणि महापुरामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं असून अनेक शेतकऱ्यांची हाता तोंडाशी आलेली उभी पिके वाहून गेलेली असून शेतकरी उध्वस्त झालेले आहेत. अनेक लोकांचे संसार उघडावे पडलेले असून अनेक शेतकऱ्यांची जनावरे मृत्युमुखी पडलेले आहेत.
अनेक नागरिकांचा यामध्ये मृत्यू झालेला आहे अशा परिस्थितीमध्ये शेतकरी हवालदिल झाला असून चिंताग्रस्त बनला आहे.
सरकारने एन डी आर एफ किंवा इतर कोणत्याही अटी न लावता शेतकऱ्यांचे सरसकट पंचनामे करून सणासुदीच्या तोंडावर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये त्वरित पैसे जमा करणे गरजेचे आहे. वास्तविक पाहता 2022 ला महाराष्ट्र सरकारने हेक्टरी १३५०० रुपयाची मदत जाहीर केली होती आणि मग आता आठ हजार पाचशे रुपये कोणत्या हिशोबाने दिले याचा प्रश्न पडलेला आहे.
वास्तविक 13500 असतील किंवा 8500 असतील हे खूप तुटपुंजी मदत आहे शेतकऱ्याला एका हेक्टर मध्ये पाळी, पेरणी, नांगरणी फवारणी जर करायचं म्हणलं तर किमान एक लाख रुपये खर्च येतो. फळबागा वाल्यांचा खर्च याच्यापेक्षा चौपट असतो,बागायतीचा खर्च या पेक्षा दुप्पट असतो तरी देखील सरकार शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करत आहे.
सरकारने या देशातील राज्यातील सर्वच नागरिकांना समान न्याय दिला पाहिजे,सरकारी मायबाप आहे परंतु अहमदाबाद येतील विमान अपघाताच्या वेळेस त्यात मृत्युमुखी पडलेल्या प्रत्येक नागरिकांना एक कोटी रुपयांची मदत केली जाते आणि या ठिकाणी जो शेतकरी जगाचा पोशिंदा असा मानला जातो ज्या शेतकऱ्यांमुळे आपण रोजचं दोन घास खाऊ शकतो अशा शेतकऱ्याचा मृत्यू झाला तर त्या शेतकऱ्याला फक्त चार लाख रुपयांची मदत केली जाते हे अतिशय दुर्दैवी आहे.
यामुळे मुख्यमंत्र्यांनी आणि पंतप्रधानांनी यामध्ये लक्ष घालून शेतकऱ्यांचे सरसकट कर्जमाफी केली पाहिजे, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करून शेतकऱ्यांच्या आयुष्यातली येणारी दिवाळी अतिशय चांगल्या प्रकारची साजरी झाली पाहिजे आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ओला दुष्काळ जाहीर केला पाहिजे अशी मागणी महाराष्ट्र सरकारकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते बाळा नांदगावकर यांनी यावेळी केली आहे.
यावेळी लातूर जिल्हाध्यक्ष शिवकुमार नागराळे, जिल्हाध्यक्ष डॉक्टर नरसिह भिकाने यांच्यासह जिल्ह्यातून शेकडो शेतकरी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व पदाधिकारी महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.

0 Comments