सोलापूर जिल्ह्यातील उत्तर सोलापूर तालुक्यातील शिवनी हे गाव अतिवृष्टी आणि महापुरामुळे उद्ध्वस्त झाले आहे.
या गावातील शेकडो शेतकऱ्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मनसे नेते दिलीप बापू धोत्रे, प्रदेश सरचिटणीस पाणी दूत डॉक्टर मनोज चव्हाण यांच्या हस्ते पिकांवरील फवारणीचे विविध औषधे, टॉनिक आणि कीटकनाशक देण्यात आले.
यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सोलापूर जिल्हाध्यक्ष विनायक महिंद्रकर, लोकसभा अध्यक्ष प्रशांत इंगळे,शहराध्यक्ष जैनुद्दीन शेख, विद्यार्थी सेनेचे राज्य उपाध्यक्ष अमर कुलकर्णी,मनसेचे पंढरपूर तालुकाध्यक्ष शशिकांत आप्पा पाटील, विधानसभा अध्यक्ष अनिल बागल, वाहतूक सेनेचे जितेंद्र टेंभुर्णीकर,शिवनीचे अध्यक्ष ओंकार गुंड,शिक्षक सेनेचे घोडके सर इत्यादी उपस्थित होते.

0 Comments