सोलापूर, दिनांक : ०२ ऑक्टोबर २०२५
राष्ट्रपिता स्व. महात्मा गांधी व भारताचे माजी पंतप्रधान स्व. लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने अभिवादन करण्यात आले.
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त रेल्वे स्टेशन येथील गांधी पुतळ्यास शहर काँग्रेस अध्यक्ष चेतनभाऊ नरोटे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तर भारताचे माजी पंतप्रधान व स्वातंत्रसेनानी लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त काँग्रेस भवन येथे त्यांच्या प्रतिमेस जिल्हा काँग्रेस अध्यक्ष सातलिंग शटगार यांच्या हस्ते व शहर अध्यक्ष चेतनभाऊ नरोटे यांच्या प्रमुख उपस्थितीत पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
या प्रसंगी बोलताना शहर काँग्रेस अध्यक्ष चेतनभाऊ नरोटे म्हणाले की, महात्मा गांधीजी व लालबहादूर शास्त्रीजी यांसारख्या असंख्य देशभक्तांनी सत्याग्रह, आंदोलन व त्यागाच्या मार्गाने देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. आज देश कठीण प्रसंगातून जात असताना पुन्हा एकदा गांधीवादी विचार व शास्त्रीजींच्या ‘जय जवान – जय किसान’ या घोषणेची प्रेरणा देशाला आवश्यक आहे. महात्मा गांधीजींचे विचार कोणीही संपवू शकत नाहीत. आम्ही त्या पक्षाचे कार्यकर्ते आहोत ज्याला गांधीजींनी साथ दिली, याचा आम्हाला अभिमान आहे. गांधीजींनी दिलेला सत्य, अहिंसा, समानता, बंधुता व सर्वसमावेशकतेचा संदेश आजही तेवढाच महत्त्वाचा आहे. जाती-धर्माच्या नावाने द्वेष पसरवला जात असताना गांधीजींच्या विचारांनीच देशाची एकता टिकून राहू शकते.
लालबहादूर शास्त्रीजींनी दिलेला साधेपणा, पारदर्शकता व प्रामाणिकपणाचा आदर्श आजच्या राजकारणाला मार्गदर्शक आहे. त्यांची ‘जय जवान – जय किसान’ ही घोषणा शेतकरी व सैनिकांच्या योगदानाचे स्मरण करून देते.
येणारे दिवस आव्हानात्मक आहेत, परंतु लोकांची सेवा हीच सर्वोत्तम सेवा आहे. लोकशाही व संविधान बळकट करण्यासाठी आपण सर्वांनी दृढसंकल्प करूया.”
या कार्यक्रमास शहर अध्यक्ष चेतनभाऊ नरोटे, जिल्हाध्यक्ष सातलिंग शटगार, माजी माहापौर अरिफ शेख, प्रदेश सचिव विनोद दादा भोसले, श्रीशैल रणधिरे, ब्लॉक अध्यक्ष देविदास गायकवाड, सेवादल अध्यक्ष भीमाशंकर टेकाळे, प्रवक्ता सेल अध्यक्ष नागनाथ कदम, भटक्या विमुक्त विभागाचे अध्यक्ष युवराज जाधव, सेवादल यंग ब्रिगेड युवक अध्यक्ष विवेक कन्ना, उपाध्यक्ष विश्वनाथ साबळे, बसवराज म्हेत्रे, शकील मौलवी, रुस्तुम कंपली, सिद्धाराम चाकोते, रामसिंग आंबेवाले, गिरीधर थोरात, अनिल मस्के, दिनेश म्हेत्रे, लखन गायकवाड, संजय गायकवाड, सागर उबाळे, सुभाष वाघमारे, रफिक चकोले, नूर अहमद नालवार, परशुराम सतारेवाले, कुणाल गायकवाड, माजी महिला अध्यक्ष अँड करीमुन्नीसा बागवान, हेमाताई चिंचोळकर, सुमन जाधव, वीणाताई देवकते, हरुण शेख, विजय शाबादी, भीमराव शिंदे, गुलाम शेख, रफिक चकोले, ज्ञानेश्वर जाधव, एजाज बागवान, आप्पा सलगर, चंद्रकांत टिक्के, रजाक कादरी, सरफराज शेख, ज्योती गायकवाड, मुमताज तांबोळी, रेखा बिनेकर, रुकियाबानू बिराजदार, अश्विनी सोलापुरे, शिवाजी साळुंखे, रफिक रामपुरे, बाबा शेख, अहमद शेख, महबूब शेख, दत्तात्रय गजभार, नागनाथ शावणे, अभिलाष अच्युगटला, सय्यद नडीवाले, अकबर शेख, हाजी महमूद शेख, आदी शहर व जिल्हा काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
▬▬▬ஜ۩(tp)۩ஜ▬▬▬

0 Comments