दि. २३ जानेवारी २०२६ पर्यंत चालणार प्रक्रिया
पंढरपूर– शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मध्ये एलएलबी (तीन वर्ष व पाच वर्ष कालावधी) ला प्रवेश घेण्यासाठी आवश्यक असलेल्या व राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष (सीईटी सेल), मुंबई यांच्या वतीने घेण्यात येणाऱ्या 'सीईटी २०२६' या परीक्षेकरिता ऑनलाईन फॉर्म भरण्याची प्रक्रिया तीन वर्ष कालावधी साठी गुरुवार, दि.०८ जानेवारी २०२६ पासून ते शुक्रवार, दि. २३ जानेवारी २०२६ पर्यंत तसेच पाच वर्ष कालावधीसाठी शुक्रवार, दि.०९ जानेवारी २०२६ पासून ते शनिवार, दि. २४ जानेवारी २०२६ पर्यंत सुरु राहणार आहे.’ अशी माहिती स्वेरीचे संस्थापक डॉ. बी. पी. रोंगे यांनी दिली.
एलएलबी (लॉ) प्रवेशासाठी अत्यंत महत्वपूर्ण समजल्या जाणार्या 'एमएएच-सीईटी २०२६' या परीक्षेसाठी फॉर्म भरण्याची मुदत (तीन वर्ष कालावधीसाठी) गुरुवार, दि.०८ जानेवारी २०२६ पासून ते शुक्रवार, दि. २३ जानेवारी २०२६ पर्यंत तसेच पाच वर्ष कालावधीसाठी शुक्रवार, दि.०९ जानेवारी २०२६ पासून ते शनिवार, दि. २४ जानेवारी २०२६ पर्यंत आहे. सदर फॉर्म भरण्याची मोफत सुविधा स्वेरी लॉ कॉलेजमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे. याचा इच्छुक विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा. विद्यार्थ्यांनी सदर फॉर्म भरण्यासाठी येताना आपल्या प्रवर्गानुसार आवश्यक असणारी फॉर्म फी आणि आवश्यक ती कागदपत्रे सोबत आणावी. हे शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरायचे आहे. सीईटी फॉर्म भरण्यासाठी विद्यार्थ्याना स्वतःचा अपार आयडी तयार करून घ्यावा लागेल, तसेच आधार कार्ड, आयडेंटी आकाराचा रंगीत फोटो, एटीएम कार्ड अथवा ऑनलाईन बँकिंगचा लॉगीन आयडी आणि त्याचा पासवर्ड, ओटीपी करिता मोबाईल या महत्वाच्या बाबी आवश्यक असणार आहेत. याबाबत शासनाच्या संकेतस्थळावर अधिक माहिती उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी प्रा. उत्तम अनुसे (मोबा.-९१६८६५५३६५), तर एल.एल.बी. संदर्भात अॅड. विक्रम पाटील (मोबा.नंबर–९०९६०१६६२५) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

0 Comments