कोर्टी : के डी यु सॉफ्टवेअर सोल्युशन, पुणे आणि न्यु सातारा पॉलिटेक्निक, कोर्टी यांच्यामध्ये विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व औद्योगिक प्रगतीसाठी सामंजस्य करार (MoU) करण्यात आला. हा करार विशेषतः कॉम्प्युटर इंजीनियरिंग व इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी इंजीनियरिंग विभागातील विद्यार्थ्यांसाठी करण्यात आला असून, यामुळे विद्यार्थ्यांना औद्योगिक प्रशिक्षण, इंटर्नशिप, प्रकल्प मार्गदर्शन तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रत्यक्ष ज्ञान मिळणार आहे.
या करारावर के डी यु सॉफ्टवेअर सोल्युशनचे सीईओ आर्यन सुर्वे आणि प्रोजेक्ट मॅनेजर सोहम शिरगिरे, तसेच न्यु सातारा पॉलिटेक्निकचे प्राचार्य विक्रम लोंढे, उपप्राचार्य आणि ट्रेनिंग व प्लेसमेंट ऑफिसर विशाल बाड यांच्या उपस्थितीत स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. हा उपक्रम विद्यार्थ्यांना उद्योगाभिमुख शिक्षण देण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
या सामंजस्य कराराअंतर्गत विद्यार्थ्यांसाठी विविध वर्कशॉप्स, सेमिनार, गेस्ट लेक्चर्स, लाइव्ह प्रोजेक्ट्स, इंटर्नशिप तसेच प्लेसमेंट मार्गदर्शन राबवले जाणार आहे. त्यामुळे ग्रामीण व निमशहरी भागातील विद्यार्थ्यांना आयटी व सॉफ्टवेअर क्षेत्रातील करिअरच्या नव्या संधी उपलब्ध होतील.
यावेळी बोलताना कंपनीचे सीईओ आर्यन सुर्वे म्हणाले की आजच्या जगात केवळ पुस्तकी ज्ञान पुरेसं नाही. प्रत्यक्ष उद्योगातील अनुभव त्यांना मिळणे गरजेचे आहे. न्यू सातारा पॉलिटेक्निक सोबत केलेला हा करार विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाशी जोडण्याचा एक मोठा मार्ग आहे. या माध्यमातून आम्ही विद्यार्थ्यांना सक्षम आणि रोजगार क्षम बनवण्याचा प्रयत्न करू.
तसेच या करारामुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रकल्प टीमवर्क व प्रोफेशनल वर्क कल्चर चा अनुभव मिळणार असल्याचे यावेळी प्रोजेक्ट मॅनेजर सोहम शिरगिरे यांनी सांगितले.
यावेळी कॉलेजचे प्राचार्य विक्रम लोंढे यांनी हा करार केवळ कागदावर मर्यादित न राहता प्रत्यक्ष अंमलबजावणीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या जीवनात आकार देणारा ठरेल असे सांगितले.
त्याचप्रमाणे ट्रेनिंग वर प्लेसमेंट ऑफिसर विशाल बाड यांनी या करारामुळे विद्यार्थ्यांना इंटर्नशी , ट्रेनिंग व प्लेसमेंट चा अधिक संधी मिळतील असे सांगितले.
हा सामंजस्य करार म्हणजे विद्यार्थ्यांसाठी नवीन दालन उघडणारा ठरणार आहे असा विश्वास दोन्ही संस्थांनी व्यक्त केला.

0 Comments