मंगळवेढा तालुक्यातील डोंगरगाव (मु.पो. खोमनाळ उपकेंद्र अंतर्गत) येथे सुरू असलेल्या दीर्घकाळच्या वीज लोडशेडिंगमुळे ग्रामस्थांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. दररोज सकाळी ५ ते ९.१५ वाजेपर्यंत तसेच सायंकाळी ५.१५ ते ७.१५ वाजेपर्यंत अशा तब्बल ७ तासांच्या वीज कपातीमुळे विद्यार्थ्यांचे शिक्षण, शेतकऱ्यांचे पाणीपुरवठा व शेतीकाम, लघुउद्योग-व्यवसाय तसेच घरगुती कामकाज पूर्णपणे विस्कळीत झाले होते. वृद्ध, आजारी व लहान मुलांनाही याचा मोठा त्रास होत असल्याचे डॉ. नंदकिशोर शिंदे व ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे निदर्शनास आणून दिले होते.
या गंभीर बाबीची तात्काळ दखल घेत प्रणिती शिंदे यांनी अधीक्षक अभियंता, महाराष्ट्र राज्य विद्युत महावितरण कंपनी, सोलापूर यांच्याकडे निवेदन सादर करून डोंगरगावातील लोडशेडिंगवर त्वरित उपाययोजना करण्याची मागणी केली.
खासदार प्रणिती शिंदे यांच्या पाठपुराव्यानंतर महावितरणने तात्काळ कार्यवाही करत संबंधित उपकेंद्रातील लोडशेडिंग बंद केले. त्यामुळे डोंगरगाव परिसरातील वीजपुरवठा सुरळीत झाला असून ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे. या तात्काळ दिलेल्या दिलास्यासाठी ग्रामस्थांनी खासदार प्रणिती शिंदे यांचे मनापासून आभार मानले आहेत.
▬▬▬ஜ۩(tp)۩ஜ▬▬▬

0 Comments