विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली असून विधानसभा अध्यक्ष ॲड. नार्वेकर यांनी विधानसभेचे कामकाज सुरळीत चालावे, यासाठी तालिका अध्यक्षांची नियुक्ती जाहीर केली, यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांना तालिका अध्यक्षपदावर तिसऱ्यांदा संधी मिळाली आहे तालिका अध्यक्षपदावर काम करण्याची संधी मिळाल्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर संतभूमीचा शिलेदार अधिवेशनात विधानसभा अध्यक्षांच्या गैरहजेरीत तालिका अध्यक्ष म्हणून कामकाज पाहणार आहेत या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये सोलापूर जिल्ह्याला वेगळं काय मिळते का याकडे अनेकांचे लक्ष लागले असून कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
त्याचबरोबर राजू खरे योगेश सागर संजय केळकर दिलीप लांडे चंद्रकांत नवघरे सुनील प्रभू अमित झनक यांचीही तालिका अध्यक्ष म्हणून निवडी झाले आहेत.
आमदार समाधान आवताडे यांची सलग तीन अधिवेशनामध्ये तालिका अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे.
पोट निवडणुकीत निवडून आल्यानंतर पहिल्यांदा आमदार समाधान आवताडे यांची तालिका अध्यक्षपदी निवड झाली होती त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये पुन्हा विजय मिळवल्यानंतर भाजपने तालिका अध्यक्ष करत मोठी संधी दिली होती त्या संधीचं सोनं करत आमदार समाधान आवताडे यांनी तालिका अध्यक्ष पदावर उत्कृष्ट काम करून वरिष्ठांची शाबासकी मिळवली होती नव्या जुन्यांना सोबत घेत प्रत्येकाला बोलण्याला वेळ देत वेगवेगळ्या विषयांचे प्रश्न समजून घेत त्यांनी प्रत्येकाच्या प्रश्नाला न्याय देण्याचा प्रयत्न केला होता त्यामुळे त्यांच्या कामाची वाहवा झाली होती नव्हते असतानाही आमदार समाधान आवताडे यांनी उत्कृष्टपणे सभागृह हाताळत अनेक प्रश्नांची सोडवणूक केली होती त्यामुळे त्यांच्या कामाच्या जोरावर यंदाही त्यांची तिसऱ्यांदा निवड करून पक्षाने त्यांच्यावर विश्वास दाखविला आहे. विधानसभेचे अध्यक्ष व उपाध्यक्ष गैरहजर असतील त्यावेळेस विधानसभेच्या सभापती पदाची धुरा तालिका अध्यक्षांना संभाळावी लागते आमदार समाधान आवताडे यांनी त्यांच्या कार्य काळामध्ये मोठ्या प्रमाणावर मतदारसंघांमध्ये निधी खेचून आणला आहे अनेक प्रलंबित प्रश्न मार्गी लावले आहेत राज्यभर त्यांच्या कामाचा गवगवा होत असून पक्षाने कामसू माणसाला पुन्हा एकदा तालिका सभागृहात पाठवून त्यांच्या कामाची दखलच घेतली असल्याचे बोलले जात असून पुन्हा एकदा आपल्या कामाची चुणूक दाखवण्याची संधी मिळणार आहे.
फोटो- समाधान आवताडे

0 Comments