LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरींग मधील प्राध्यापकांच्या पेटंटला भारत सरकारकडून मान्यतासंशोधन विभागाला आणखी मिळाली गती

 

पंढरपूर- ‘गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील श्री.विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरींग (ऑटोनॉमस) मधील प्राध्यापकांनी फाईल केलेल्या पेटंटला भारत सरकारच्या पेटंट विभागाकडून मान्यता प्राप्त झाली आहे.’ त्यामुळे त्यांच्यावर सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. 
          अभियांत्रिकीच्या क्षेत्रामध्ये सातत्याने नवनवीन गोष्टींचे संशोधन चालू असते. ‘आयओटी बेस्ड डिजिटल अल्ट्रासोनिक पल्स व्हेलोसिटी टेस्ट डिव्हाईस’ हे काँक्रीट संरचनांचे विनाशक नसलेले (नॉन डीस्ट्रेक्टिव्ह) मूल्यमापन करण्यासाठी विशेषतः डिझाइन केलेले एक स्मार्ट उपकरण आहे. या डिझाइनमध्ये एकात्मिक हाऊसिंग युनिट असून त्यामध्ये अल्ट्रासोनिक ट्रान्सड्यूसर्स, डिजिटल डिस्प्ले इंटरफेस आणि वायरलेस एलओटी कम्युनिकेशन मॉड्यूल्स अंतर्भूत आहेत. याची बाह्य रचना आकर्षक, संक्षिप्त व पोर्टेबल केसिंगसह असून एर्गोनॉमिक प्रोब होल्डर्स आणि सुबकपणे मांडलेले कंट्रोल पॅनेल लेआउट यांचा समावेश आहे. नवोन्मेषी बाह्य आकार, घटकांची मांडणी आणि वापरकर्ता-अनुकूल इंटरफेसची सौंदर्यात्मक रचना यांमुळे या उपकरणाच्या डिझाइन पेटंट अंतर्गत दावा केलेल्या नवीन डिझाइनची वैशिष्ट्ये स्पष्ट होतात. प्राध्यापकांनी तयार केलेल्या या उपकरणामुळे रिअल-टाइम मॉनिटरिंग, अचूक व विश्वसनीय मोजमाप, डेटा ऑटो-सेव्ह व क्लाउड स्टोरेज, रिपोर्ट जनरेशन सोपे, रिमोट ऍक्सेस व कंट्रोल, वेळ व खर्च बचत, संरचनेची गुणवत्ता तपासणी सोपी होते, डेटा अ‍ॅनालिटिक्स व ट्रेंड विश्लेषण, पारदर्शकता व ट्रेसिबिलिटी असे भविष्यात फायदे होतात. भारत सरकारच्या पेटंट कार्यालयाकडून ह्या उपकरणाच्या पेटंटचे प्रमाणपत्र मिळाले आहे. या पेटंटसाठी सिव्हिल इंजिनिरिंगचे विभागप्रमुख डॉ. प्रशांत रमेश बामणे, प्रा.गणेश कुमार कोष्टी, प्रा.निशिगंधा वैजनाथ महामुनी, प्रा.अविनाश बाबासो कोकरे, प्रा. अमृता लुगडे, प्रा.आरती भानवसे व प्रा.वैभवी गलांडे या सात प्राध्यापकांनी अभ्यास केला होता. बरेच दिवस काम केल्यानंतर त्यांना हे यश मिळाले आहे. या यशाबद्दल संस्थेचे  अध्यक्ष अशोक भोसले,  उपाध्यक्ष सुरेश राऊत, सचिव डॉ. सुरज रोंगे, संस्थेचे इतर पदाधिकारी व विश्वस्त, सर्व संचालक मंडळ, स्वेरी कॅम्पस इन्चार्ज डॉ. एम.एम. पवार, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूरच्या विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. प्रशांत पवार, बी.फार्मसीचे प्राचार्य डॉ. एम. जी. मणियार, डिप्लोमा इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ.एन.डी.मिसाळ, डी.फार्मसीचे प्राचार्य प्रा. एस.व्ही.मांडवे, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग च्या उपप्राचार्या डॉ. मिनाक्षी पवार, संशोधन अधिष्ठाता डॉ.अभिषेक एम.एस., इतर अधिष्ठाता, सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी यांनी अभिनंदन केले.

Post a Comment

0 Comments