LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरींगच्या प्रा. वनिता जाधव-बागल यांना पीएच.डी. प्राप्त



पंढरपूर- गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री. विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयुट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (ऑटोनॉमस) च्या कॉम्प्यूटर सायन्स अँड इंजिनिअरिंग या विभागात कार्यरत असलेल्या प्रा.वनिता ज्ञानदेव जाधव-बागल यांना नुकतीच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून  पीएच.डी. प्राप्त झाली आहे. डॉ. वनिता जाधव  यांनी अभियांत्रिकी मधील कॉम्प्यूटर सायन्स अँड इंजिनिअरिंग या विभागात ‘अॅक्युरेट टेक्निकज् फॉर अर्ली स्टेज लंग कॅन्सर डिटेक्शन युजिंग इंटेलिजंट लर्निंग अप्रोच' या विषयावर आपला शोधप्रबंध सादर केला होता. या यशाबद्धल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
     वडगाव (पुणे) येथील एस.के.एन. कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे डॉ. ललित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, स्वेरीचे संस्थापक व कॉलेज ऑफ इंजिनिअरींगचे प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे यांच्या प्रेरणेने व पती डॉ.शेखर बागल यांच्या सहकार्याने प्रा. वनिता जाधव यांनी ही पीएच.डी. पूर्ण केली आहे. त्यांनी ‘इमेज प्रोसेसिंग विथ डीप लर्निंग’ या क्षेत्रात महत्त्वपूर्ण संशोधन केले आहे. या संशोधनात त्यांनी नवीन डीप लर्निंग मेथड्स फॉर मेडिकल इमेज प्रोसेसिंगवर काम केले आहे. प्रा. वनिता जाधव यांनी पीएच.डी. दरम्यान ३ संशोधन पेपर प्रतिष्ठित नियतकालिकांमध्ये प्रकाशित केले आहेत आणि २ पेपर्स आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये सादर केले आहेत तसेच आंतरराष्ट्रीय जर्नल्स मधून त्यांचे शोधनिबंध प्रकाशित झाले आहेत. प्रा. वनिता जाधव यांचे हे यश केवळ त्यांच्या समर्पण आणि कौशल्याचे प्रतीक नाही, तर स्वेरी महाविद्यालय, पंढरपूरलाही गौरवान्वित करणारे असे आहे. डॉ. जाधव ह्या स्वेरी संचालित कॉलेज ऑफ इंजिनिअरींगच्या कॉम्प्यूटर सायन्स अँड इंजिनिअरिंग या विभागामध्ये गेल्या २० वर्षांपासून उत्कृष्टपणे ज्ञानदान करत आहेत. पीएच.डी. प्राप्त झाल्याबद्दल डॉ. वनिता जाधव यांचा उपप्राचार्या डॉ. मिनाक्षी पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. संस्थेचे संस्थापक व कॉलेज ऑफ इंजिनिअरींगचे प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे, संस्थेचे अध्यक्ष अशोक भोसले, उपाध्यक्ष सुरेश राऊत, सचिव डॉ. सुरज रोंगे, इतर विश्वस्त व पदाधिकारी, स्वेरी कॅम्पस इन्चार्ज डॉ.एम.एम. पवार, तसेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूरच्या विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. प्रशांत पवार, संस्थेअंतर्गत असणाऱ्या बी. फार्मसीचे प्राचार्य डॉ. एम. जी. मणियार, डिप्लोमा इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. एन.डी. मिसाळ, डी. फार्मसीचे प्राचार्य प्रा. सतिश मांडवे, इंजिनिअरींगच्या उपप्राचार्या डॉ. मिनाक्षी पवार, कॉम्प्यूटर सायन्स अँड इंजिनिअरिंगच्या विभागप्रमुख डॉ. प्राजक्ता सातारकर, डॉ. स्वाती पवार, अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी डॉ. वनिता जाधव यांचे अभिनंदन केले आहे.

चौकट- 
स्वेरीचे संस्थापक डॉ. बी.पी. रोंगे सर हे सर्व शिक्षक,  शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना व विद्यार्थ्यांंना उच्चशिक्षण व संशोधनासाठी नेहमीच प्रेरणा व प्रोत्साहन देत असतात. आज स्वेरीतील सुमारे ४५ प्राध्यापकांनी आय.आय.टी., एन.आय.टी., आय. आय. एससी. अशा विविध प्रख्यात संस्थामधून पीएच.डी. पूर्ण केली असून सुमारे ६० प्राध्यापक पीएच.डी. पूर्ण करण्याच्या प्रक्रियेमध्ये आहेत. डॉ. बी. पी. रोंगे सर यांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनाखाली स्वेरीच्या विद्यार्थ्यांनी संशोधन क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करत तब्बल १६ पेटंट्स प्रकाशित केले आहेत तसेच सुमारे ६० विद्यार्थी स्वतः पेटंट्स फाइल करण्याच्या प्रक्रियेत आहेत. या बाबी स्वेरीच्या संशोधन परंपरेचे आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे प्रतीक आहेत.

Post a Comment

0 Comments