रविवार दिनांक 20 सप्टेंबर 2026 रोजी सदानंद मल्टीपर्पज हॉल मिरज रोड, सांगोला येथे माजी सैनिक व त्यांच्या धर्मपत्नी, वीरमाता, वीरपत्नी यांच्या एकूण 500 ते 600 जणांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. प्रथम पाहुण्यांच्या हस्ते सरस्वती पूजन व महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाच्या सुरुवातीस राष्ट्रगान म्हणण्यात आले आणि शहिदांना दोन मिनिटे उभे राहून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.या वर्धापन दिनास सांगोला तालुक्यातील वासुद-अकोला, मानेगाव ,जवळा,सोनंद, राजापूर, निजामपूर, पाचेगाव बुद्रुक, कोळे, हणमंतगाव, चिणके, कडलास घेरडी येथील आजी-माजी सैनिक संघटना तसेच तालुक्यातील सर्व गावातून माजी सैनिक भरपूर आले होते तसेच सोलापूर, सांगली, जत, औंढी, आटपाडी, मंगळवेढा, लेंडवेचिंचाळे, आरग-बेडग, रेवनाळ, मोहोळ, मरवडे, दिघंची, बनपुरी, करमाळा, माळशिरस, माढा या ठिकाणच्या सर्व आजी-माजी सैनिक संघटना आपल्या पदाधिकाऱ्यांसोबत उपस्थित झाल्या. वर्धापन दिनाचे प्रमुख पाहुणे अध्यक्ष म्हणून सेवानिवृत्त लेफ्टनंट कर्नल सतेश दैवानराव हंगे साहेब आपल्या परिवारासोबत आले होते तसेच सूर्योदय ग्रुपचे अध्यक्ष मा. अनिल भाऊ इंगवले सर, मा.सचिन ज्वेलर्सचे मालक सचिन मिसाळ सर, संस्थापक, नेते किसान व वॉटर आर्मीचे मा. प्रफुल्ल कदम सर सांगोला विद्यामंदिर कॉलेजचे प्राचार्य मा. चारुदत्त जगताप सर, स्टेट बँक ऑफ इंडियाचे वाईस मॅनेजर मा. सादिक बागवान सर पेन्शनर शिक्षक संघाचे अध्यक्ष मा. वसंत दिघे गुरुजी, संस्थेचे वकील एडवोकेट ज्योती जाधव मॅडम, स्वास्तिक ज्वेलर्सचे मालक, संभाजी ब्रिगेडचे मा. अरविंद भाऊ केदार या सर्वांच्या उपस्थितीत वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाचे नियोजन, सूत्रसंचालन ज्यांनी केले ते म्हणजे संस्थेचे उपाध्यक्ष- सुभेदार मेजर रविकांत गणपत मराळ साहेब यांनी संस्थेचे प्रास्ताविक आपल्या धडाकेबाज अंदाज मध्ये करताना संस्थेची स्थापना, वैशिष्ट्ये, उद्दिष्टे, कार्यप्रणाली, लेखाजोखा आणि आत्तापर्यंत केलेली कामे आणि इथून पुढे करण्यात येणारी कामे तसेच सैनिकांच्या समस्या, अडीअडचणी कशाप्रकारे सांगलो तालुक्याच्या तहसीलदार साहेबांच्या मदतीने सोडवितो तसेच जिल्हा सैनिक बोर्ड लोकप्रतिनिधी, नगराध्यक्ष, पोलीस इन्स्पेक्टर भूमिलेखा ऑफिस, सेतू कार्यालय यांच्या मदतीने सोडवल्या जातात तसेच माजी सैनिका तर्फे प्रशासनास खास करके नगरपरिषद सांगोला यांना विनंती करण्यात आली की प्रशासनाच्या इमारतीत वीर जवान तुझे सलाम हे लिहिले जावे आणि वीर सैनिकांचा सन्मान वाढवावा. बगीचा नंबर 47,चिंचोली रोड या ठिकाणी बनवण्यात आलेल्या शहीद स्मारकाचे उद्घाटन लवकरात लवकर करावे तसेच या ठिकाणी वार ट्रॉफी म्हणून class-7 रणगाडा आणण्यासाठी नगरपरिषदेने प्रयत्न करावेत, माजी सैनिकांच्या ऑफिस साठी बिगर भाडेतत्त्वावर गाळा उपलब्ध करून द्यावा तसेच सैनिक भवनाची मागणी, ECH,CSD Canteen सुविधा यासाठी तालुक्याचे आमदार साहेब, माजी आमदार साहेब, तालुक्याचे खासदार साहेब, भाजपा जिल्हाध्यक्ष या सर्वांना सैनिकांतर्फे विनंती आहे की या सर्व कामासाठी आपण सर्वांनी लक्ष द्यावे आणि लवकरात लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न करावे. याचवेळी माननीय प्रफुल्ल कदम सरांनी सांगोला भूषण या पुरस्काराची घोषणा केली आणि लिखित स्वरूपात पत्र सांगोला भूषण या पुरस्कारासाठी संस्थेस व रविकांत मराळ साहेब यांना हे पत्र देण्यात आले. सांगलीचे माजी सैनिक सतीश पाटील मेजर, स्टेट बँकेचे व्हाईस मॅनेजर सादिक भगवान सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले तसेच माजी सैनिकांना मार्गदर्शन केले तसेच अनिल भाऊ सर, अरविंद भाऊ केदार यांनी आजी माजी सैनिकांचे आपले मनोगत व्यक्त करताना भरभरून कौतुक केले. तसेच सचिन ज्वेलर्स चे मालक सचिन मिसाळ यांच्याकडून आलेल्या सर्व माजी सैनिकांना भेटवस्तू देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. तसेच जय जवान माजी सैनिक संस्थेतर्फे आलेल्या सर्व आजी माजी संघटनांचा तसेच सर्व मान्यवरांचा संस्थेतर्फे सन्मानचिन्ह म्हणून आकर्षक ट्रॉफी, शाल व गुलाबपुष्प पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. यानंतर संस्थेचे तडफदार अध्यक्ष सिद्धेश्वर रामचंद्र पाटील मेजर यांनी आभार प्रदर्शन करून कार्यक्रम समाप्तीची घोषणा केली. संस्थेतर्फे येथेच्च मिष्ठान्न भोजनाची व्यवस्थापन संस्थेकडून करण्यात आली होती त्याचा पण सर्वांनी आस्वाद घेतला. भारत माता की जय, वंदे मातरम,जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र, जय शिवराय.
0 Comments