कॉपर वायर चोरीचे एकूण 06 गुन्हयांची उकल सौरउर्जा प्लांट मधील व नदीकाठावरील मोटारीचे केबल वायर चोरणारे जेरबंद एकूण 145 किलो ग्रॅम वजनाचे कॉपर वायर जप्त करुन 1,88,500 रु. किंमतीचा मुद्देमाल हस्तगत
मा. पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण श्री. अतुल कुलकर्णी यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ट पोलीस निरीक्षक श्री. संजय जगताप यांना सोलापूर ग्रामीण जिल्हयामध्ये सौरउर्जा सोलर प्लॉट मधील, व इलेक्ट्रीक पंम्प, पानबुडी मोटार मधील कॉपर वायर चोरींच्या गुन्हयांची उकल करणेकामी आदेशित केले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. संजय जगताप यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानदेव वाघ व त्यांचे पथकास इलेक्ट्रीक मोटारीतील कॉपर वायर चोरीच्या गुन्हयांची उकल व सदर मोडसचे आरोपींना चेक करुन गुन्हे उकल करणेबाबत सुचना दिल्या होत्या.
त्याप्रमाणे सपोनि ज्ञानदेव वाघ व त्यांचे पथक मालाविषयी गुन्हयाची उकल करणेकामी सोलापूर तालुका पोलीस ठाणे मौजे रानमसले ता. उतर सोलापूर या गांवात हजर असताना पथकातील पोलीस अंमलदार यांना त्यांचे गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली कि, मौजे रानमसले ता. उत्तर सोलापूर जि. सोलापूर येथील राहणारा इसम नामे समाधान पवार याने त्याचे साथिदारासह गौडगाव ता. बार्शी येथील सोलर प्लांट मधील कॉपर वायरची चोरी केली असून त्याने त्याचे साथीदारा सोबत सोलापूर ग्रामीण जिल्हयामध्ये उंदरगाव, वडशिंगे, बेंबळे, रांझणी, ता. माढा, इत्यादी ठिकाणी कॉपर वायरची चोरी केली असून तो सध्या चोरुन आणलेल्या मालाची विक्री करणेकरिता तो गांवातील त्याचे घरासमोर थांबलेला आहे. अशी खात्रीशीर बातमी मिळाली. सदरची बातमी मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. संजय जगताप, स्थानिक गुन्हे शाखा सोलापूर ग्रामीण यांना कळविले असता, त्यांनी सपोनि ज्ञानदेव वाघ यांना कारवाई करणेबाबत आदेश दिले.
सपोनि ज्ञानदेव वाघ व त्यांचे पथक मिळालेल्या बातमीतीप्रमाणे मौजे रानमसले ता. उत्तर सोलापूर येथे जावून बातमीप्रमाणे आरोपीचा शोध घेतला असताना सदरचा इसम हा बातमीप्रमाणे त्याचे राहत्या घराजवळ उभा असलेला दिसला. सपोनि ज्ञानदेव वाघ यांना बातमी प्रमाणे संशय आल्याने, त्यास ताब्यात घेवून त्यांचे नांव व पत्ता विचारता तो उडवाउडवीचे उत्तरे देवू लागला, विश्वासात घेवून पोलीस असल्याचे सांगून त्याचे नांव व पत्ता विचारता त्याने त्याचे नांव 1) समाधान नवनाथ पवार वय-21 वर्षे, रा. रानमसले ता. उत्तर सोलापूर असे असल्याचे सांगितले. त्याचे राहते घर तपासून पाहता घरामध्ये प्लॉस्टिकच्या वेवेगळया पोत्यामध्ये भरुन ठेवलेले वायरचे पोते मिळून आले. त्याचे घरामध्ये मिळून आलेल्या मालाबाबत त्याच्याकडे कौशल्यपूर्ण तपास करता, त्याने मागील काही महिन्यापासून तो स्वतः व त्याचा आणखीन एक साथीदार असे दोघांनी मिळून मौजे उंदरगाव, वडशिंगे, बेंबळे, रांझणी, ता. माढा, इत्यादी ठिकाणाहून कॉपर वायरची चोरी केली असून रात्रीच्या वेळी जावून सोलर प्लांट मधील व नदीकाठच्या ठिकाणावरील कॉपर वायरची व केबल वायर चोरुन आणल्यानंतर ते रानामध्ये केबल वायर जाळून वेळोवेळी वेगवेगळया पोत्यामध्ये भरुन त्याची विक्री करणकरीता ठेवलेले असलेबाबत सांगितले. त्याचेकडून त्याच्या घरातील एका खोलीमध्ये चोरीकरुन विक्रीकरीता ठेवलेले एकूण 06 तांब्याचे तार प्लास्टिकच्या पोत्यामध्ये मिळून आले. सदर आरोपीने चोरी केलेले ठिकाण दाखविले असता, त्याबाबत संबंधीत पोलीस ठाणेचे अभिलेख पाहिले असता, त्याबाबत खालील प्रमाणे गुन्हे दाखल आहेत.
अ.क्र.
पोलीस ठाणे
01
गुरनं
कलम
वैराग
02
248/2026
बीएनएस 303 (2)
माढा
03
125/2026
बीएनएस 303(2)
माढा
04
211/2026
बीएनएस 303(2)
टेंभूर्णी
05
118/2026
बीएनएस 303(2)
06
टेंभूर्णी
139/2026
बीएनएस 303(2)
टेंभूर्णी
207/2026
बीएनएस 303(2)
आली आहे. सदर आरोपीस वैराग पोलीस ठाणे गुरनं 248/2026 बीएनएस 303 (2) प्रमाणे दाखल गुन्हयात अटक करण्यात
सदरची कामगिरी मा. पोलीस अधिक्षक श्री. अतुल कुलकर्णी, मा. अपर पोलीस अधिक्षक श्री. विजय कबाडे, मा. अपर पोलीस अधिक्षक श्रीमती प्रेरणा कट्टे यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. संजय जगताप यांचे नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि ज्ञानदेव वाघ, पोलीस उपनिरीक्षक ख्वाजा मुजावर, सफौ नारायण गोलेकर, धनाजी गाडे, पोहेकॉ नागेश कोणदे, मोहन मनसावाले, पोलीस अंमलदार दिनेश पवार, कोंडीबा मोरे, अक्षय डोंगरे, सतिष बुरकुल, कपिल काटकर, महिला पोलीस अंमलदार अश्विनी गोटे यांचे पथकाने कामगिरी बजावली आहे.

0 Comments