LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

वृत्तलेखन ही एक कला असून ते फक्त माहिती देणे एवढ्या पुरते मर्यादित राहिले नाही तर आता संवादाचे माध्यम बनले आहे. असे प्रतिपादन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. अंबादास भासके यांनी केले.


वृत्तलेखन ही एक कला असून ते फक्त माहिती देणे एवढ्या पुरते मर्यादित राहिले नाही तर आता संवादाचे माध्यम बनले आहे. असे प्रतिपादन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. अंबादास भासके यांनी केले. तर वृत्तलेखनामध्ये स्पष्टपणा, परखडपणा, आणि लोकहिताचे प्रश्न मांडल्यास ते लेखन जन माणसात लोकप्रिय होते. असे न्यू आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, अहिल्यानगर चे सहाय्यक प्राध्यापक डॉ. बापू चंदनशिवे यांनी सांगितले. अखिल भारतीय डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघाच्या सोलापूर जिल्हा शाखेने आयोजित केलेल्या वृत्तलेखन कार्यशाळा या उपक्रमात ते बोलत होते.
जिल्ह्यातील पत्रकारांच्या लेखणीला आणखी धार चढावी, त्यांच्या वृत्तलेखनात कौशल्य पूर्ण विकास व्हावा, यासाठी अखिल भारतीय डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघाचे सोलापूर जिल्हाध्यक्ष सचिन कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यातील सर्व पत्रकारांसाठी मोफत वृत्तलेखन कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर येथील मास कम्युनिकेशन विभागाचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. अंबादास भासके आणि अहिल्यानगर येथील न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेजच्या मीडिया अँड मास कम्युनिकेशन विभागाचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. बापू चंदनशिवे हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. तर अखिल भारतीय डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष सतीश सावंत, राज्य तांत्रिक सल्लागार नागनाथ सुतार, सोलापूर जिल्हाध्यक्ष सचिन कुलकर्णी, जिल्हा कार्याध्यक्ष तानाजी जाधव, शहराध्यक्ष सोहन जयस्वाल, तालुकाध्यक्ष नामदेव लकडे, मराठी पत्रकार संघाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष राजेंद्र कोरके, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे शहराध्यक्ष अपराजित सर्व गोड, नगरसेवक दीपक चंदनशिवे, आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते.
सुरुवातीला श्री विठ्ठल आणि आद्य पत्रकार दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमांचे झाल्यानंतर उपस्थित मान्यवरांचे सोलापूर जिल्हा शाखेच्या वतीने स्वागत करण्यात आले. संघटनेच्या वतीने पत्रकारांसाठी राबविण्यात आलेले आरोग्य शिबिर, प्रशिक्षण कार्यक्रम, याचबरोबर विविध उपक्रमांची माहिती, या वृत्तलेखन कार्यशाळेची भूमिका जिल्हाध्यक्ष सचिन कुलकर्णी यांनी आपल्या प्रास्ताविकातून विशद केली. त्यानंतर वृत्तलेखन कार्यशाळेला सुरुवात झाली.
या कार्यशाळेला जिल्हाभरातून पत्रकारांचा अतिशय उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. दोन्ही प्रमुख मार्गदर्शक यांनी अतिशय अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले. समोर उपस्थित पत्रकार यांनी देखील त्यांचे महत्त्वाचे मुद्दे नोंद करून घेत आपल्या ज्ञानात भर घातली. व्याख्यानानंतर उपस्थित पत्रकारांच्या शंका आणि प्रश्नांना प्रमुख मार्गदर्शकांनी खुलेपणाने उत्तरे देत त्यांच्या शंकांचे निरसन केले. 
संघाचे जिल्हा कार्यकारणी सदस्य प्रशांत माळवदे यांनी या संपूर्ण कार्यक्रमाचे अतिशय बहारदार सुत्रसंचलन केले.
कार्यशाळेच्या शेवटी दोन्ही प्रमुख मार्गदर्शकांना डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघाच्या वतीने उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. तर कार्यशाळेत सहभाग घेतलेल्या सर्व पत्रकारांना प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वीपणे पूर्ण केल्याबद्दल प्रशस्तीपत्र देण्यात आले. पत्रकारांच्या लेखणीला कौशल्य आणि गुणवत्तेचे बळ देण्यासाठी आयोजित केलेल्या वृत्तलेखन कार्यशाळा या अनोख्या उपक्रमाबद्दल अखिल भारतीय संपादक पत्रकार संघाच्या सोलापूर शाखेचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Post a Comment

0 Comments