LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

प्रथम वर्ष डी.फार्मसीच्या प्रवेशाचा कॅप राऊंड-१ दि. २४ सप्टेंबर २०२६ पासून सुरुदि.२७ सप्टेंबर २०२६ पर्यंत चालणार प्रक्रिया



पंढरपूरः गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री. विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित डी.फार्मसी (डिप्लोमा) महाविद्यालयात प्रथम वर्ष प्रवेश प्रकियेची पहिली फेरी (फर्स्ट कॅप राऊंड) गुरुवार, दि. २४ सप्टेंबर २०२६ पासून सुरु होणार असून ती रविवार, दि.२७ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत चालणार आहे. स्वेरीच्या फॅसिलिटेशन सेंटर (एफ.सी.क्रमांक ६५०५) मध्ये कॅप राउंडचे ऑनलाईन ऑप्शन फॉर्म भरण्याची सोय केली आहे. २००६ पासून सुरु असलेल्या डी. फार्मसी महाविद्यालयाला पालकांचा 'उत्स्फूर्त प्रतिसाद' पाहून शैक्षणिक वर्ष २०२१-२२ पासून स्वेरी अंतर्गत असलेल्या बी. फार्मसी महाविद्यालयांतर्गत नवीन डी. फार्मसीच्या अभ्यासक्रमाला मान्यता मिळाली आहे. तसेच  दोन्ही  महाविद्यालये मिळून या कोर्ससाठी १२० विद्यार्थी प्रवेश क्षमता आहे.’ अशी माहीती श्री. विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयूट, पंढरपूरचे संस्थापक डॉ. बी.पी. रोंगे यांनी दिली. 
         सन २०२६-२७ च्या पदविका फार्मसी अर्थात डी. फार्मसी प्रवेशाकरीता यापूर्वीच ऑनलाईन रजिस्ट्रेशन फॉर्म भरणे, भरलेले अर्ज स्विकारुन कागदपत्रांची तपासणी, पडताळणी, अर्ज कायम करणे आदी प्रक्रिया दिलेल्या अवधीत पार पडल्यानंतर आता येत्या गुरुवार, दि.२४ सप्टेंबर पासून ते रविवार, दि. २७ सप्टेंबर पर्यंत प्रवेशाची पहिली फेरी (कॅप राउंड-१) चालणार आहे. यामध्ये आपल्याला योग्य महाविद्यालयाची निवड करावी लागणार आहे. यासाठी विशेष अभ्यास करून कॅप राऊंड-१ चे ऑप्शन फॉर्म ऑनलाइन भरावेत. महाविद्यालय निवडताना महाविद्यालयात दरवर्षी होणारे प्रवेश, विद्यार्थ्यांच्या परीक्षेचे निकाल, सोयी-सुविधा, उच्च शिक्षित प्राध्यापक वर्ग या बाबींचा प्रामुख्याने विचार करावा. विद्यार्थ्यांनी अभ्यास करून करिअरच्या दृष्टीने योग्य महाविद्यालयाची निवड करणे गरजेचे आहे. कॅप राउंडच्या या चार दिवसात घेतलेला निर्णय अत्यंत महत्वाचा ठरणार आहे. ऑनलाईन रजिस्ट्रेशन केलेल्या सर्व विद्यार्थ्यांना या फेरीचा लाभ घेता येणार आहे. डी. फार्मसी प्रवेशाची अलॉटमेंट यादी महाराष्ट्र शासनाच्या राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाच्या संकेतस्थळावर मंगळवार दि.२९ सप्टेंबर रोजी प्रसिद्ध होणार आहे. पहिल्या फेरीसाठी वाटप करण्यात आलेल्या जागेची स्विकृती  आणि निश्चिती ही बुधवार, दि.३० सप्टेंबर ते शुक्रवार, दि.०२ ऑक्टोबर या दरम्यान करता येणार आहे. प्रथम वर्ष डी.फार्मसीच्या प्रवेशासंदर्भात अधिक माहितीसाठी प्रा. एन.ए. दांडगे (मोबा.क्र. ९३७३०९१०४१) व डॉ. वृणाल मोरे (मोबा.क्र. ९६६५१९६६६६) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. स्वेरीचे संस्थापक डॉ. बी.पी. रोंगे यांच्या नियोजनबद्ध मार्गदर्शनाखाली प्राचार्य डॉ. सतीश मांडवे व प्राचार्य डॉ. मिथुन मणियार यांच्या नेतृत्वाखाली अभ्यासू शिक्षकांच्या सहकार्याने विद्यार्थ्यांना शिक्षित करण्याचे कार्य उत्तमरीत्या सुरु आहे.

Post a Comment

0 Comments